*मंगरूळ. प्रतिनिधी*
*चांदसाहेब शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
तुळजापुर तालुक्यातील मौजे मंगरुळ व देवसींगा नळ येथे प्रतिवर्षाप्रमाणे पारंपरिक पद्धतीने मोहरमच्या हसन हुसेन पंजाची स्थापना मंगळवार १जुलै रोजी करण्यात आली असुन यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे
याबाबत सविस्तर वृत्तअसे की इस्लाम धर्मामध्ये मोहरमच्या महिन्यास अनन्य साधारण महत्व असून इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू ( नवासा ) हजरत इमाम हसन - हुसेन व सीरिया सुलतान मजीद इबने माविया यांच्यात इराक येथील करबला येथे युद्ध ( जंग )झाली होती धर्मप्रसार करत असताना हसन हुसेन यांच्यासह त्यांच्या ७२ साथीदारांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती यामध्ये लहान मुले , तरुण पुरुष , महिला यांचा समावेश होता विशेष म्हणजे यामध्ये प्रामुख्याने अली असगर नावाच्या ६ महिन्याच्या बालकाचाही समावेश होता
या मोहरम महिन्यातील घटनेच्या आठवणी प्रित्यर्थ रूढी परंपरेनुसार मोहरमच्या ५ तारखेला मंगरूळ गावात चार ठिकाणी यामध्ये थोरली वेस , धाकटी वेस , मुलतानवाडी , लबडे गल्ली ( मठात ) पंजाची स्थापना करण्यात येते तर देवसिंगगा नळ येथे मस्जिदमध्ये एका ठिकाणी स्थापना करण्यात येते
मोहरमच्या ९ तारखेला म्हणजे शनिवार ५ जुलै रोजी रात्री उशिरा मंगरुळ गावात तीन ठिकाणी व देवसिंगा नळ येथे दर दोन वर्षांनी प्रचंड मोठया प्रमाणात अग्नी तयार करून रात्री उशिरा पंजाची मिरवणूक काढण्यात येते व खत्तल साजरी करण्यात येते या सर्व धार्मिक विधीसाठी दोन्ही गावातील सर्वच जाती धर्माच्या लोकांना विविध प्रकारचे मान घालून दिलेले आहेत व ते आज रोजी पर्यंत तंतोतंत पाळले जातात तसेच दुसऱ्या दिवशी रविवार ५ जुलै म्हणजे मोहरमच्या १० तारखेला सायंकाळी पाच वाजता परत एकदा पंजाची मिरवणूक काढण्यात येते व रात्री परत डोल्यांची मिरवणूक काढून या सर्व आगळ्या वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात येते
*चौकट*
___________________
*हा सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी गेल्या वीस वर्षांपूर्वी तालुका जिल्ह्यासह परजिल्ह्यातीलही भाविक या दोन्ही गावात मोठ्या संख्येने उपस्थित होत होते असे ज्येष्ठ नागरिक आवर्जून उल्लेख करतात या सर्व कार्यक्रमावेळी हैदोस दुल्लl हा खेळ खेळला जातो व 'हसन हुसेन की दोचार हो दिन' अशा गगनभेदी घोषणाही दिल्या जातात आत्तापर्यंत आम्ही सर्व जातीधर्मानी एकत्र येत हा सण साजरा केला आहे व पुढील काळातही गावातील सर्वच जातीधर्माच्या युवकांनी एकत्र येत हा सण मोठया भक्तिभावा ने साजरा करावा अशी अपेक्षा दोन्ही गावातील ज्येष्ठ नागरिकांतुन व्यक्त केली जात आहे*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा