Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १२ जुलै, २०२५

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बावडा येथे ग्रामस्थांच्या वतीने तोफांच्या सलामीत स्वागत

 


*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147

- जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या प्रवासात आज बावडा येथे दुपारी २ वाजता तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. भानुदास मोरे महाराज यांचा सत्कार सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे माजी संचालक महादेवराव घाडगे यांनी बावडा ग्रामस्थांच्या वतीने केला.

     जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासात आज बावडा येथे आला. याप्रसंगी शंकर घाडगे, अंकुश घाडगे, रणजित घाडगे, सदाशिव कदम, नागेश गायकवाड, शरद गायकवाड, अनिल कांबळे, दादा डाळिंबे, अभिजित चव्हाण, सुयश लोखंडे, अजिंक्य जगताप, सचिन सावंत, विकास धायगुडे आदि मान्यवर उपस्थित होते.

     जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे जाताना सराटी येथे सोमवार ३० जून रोजी मुक्कामी होता. तसेच मंगळवार १ जुलै रोजी सकाळी नीरा नदीच्या पात्रात खळखळत्या पाण्यात संस्थानच्या विश्वस्थांनी पादुकांना शाही स्नान घातले. त्यानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज कडे मार्गस्थ झाला होता.

    जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरहून गुरूवार १० जुलै रोजी निघाला त्याचा पहिला मुक्काम वाखरीत, दुसरा मुक्काम महाळूंग येथे केल्यानंतर आज वडापूरी येथील मुक्कामास जाताना दुपारी सराटी येथील नीरा नदीवरील पूल ओलांडून दुपारी २ वाजता बावडा येथे आला होता. त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे तोफांच्या सलामीत स्वागत करण्यात आले. त्यानंतर सोहळा वकिलवस्ती मार्गे वडापूरी येथील मुक्कामास मार्गस्थ झाला.

फोटो - बावडा येथे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करताना ग्रामस्थ मंडळी दिसत आहेत.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा