*अकलूज--- प्रतिनिधी*
*केदार लोहोकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
महाराष्ट्र राज्य जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती सीमाताई बोके यांच्या मार्गदर्शनाने जिजाऊ ब्रिगेड पंढरपूर विभाग जिल्हा सोलापूर यांच्या वतीने जिल्हाध्यक्षा शिवमती मनोरमा लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रामनगर येथे शिवविचार बैठकीणचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिजाऊ वंदना घेऊन जिजाऊ चरित्र वाचन करण्यात आले. पुस्तक वाचन झाल्यानंतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे विचार आचार, स्वराज्य निर्मितीची तळमळ,छत्र पती शिवाजीराजे यांना दिलेले धडे,अत्याचारा विरुद्ध लढा देण्याचे धाडस या सर्व गोष्टीबद्दल विचार विनिमय करणेत आले.
सध्याच्या टिव्ही व मोबाईलच्या अधुनिक युगात लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृती जपून ठेवून आपल्या देशातील आदर्श व्यक्ती व त्यांचे विचार जीवनचरित्र यांचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्या समाजात खूप परिवर्तन होईल.असे जिल्हाध्यक्षा शिवमती मनोरमा लावंड यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.सध्या महाराष्ट्र राज्य जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष शिवमती सीमाताई बोके यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर शिवविचार मांडण्यात येत आहेत.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्षा शिवमती मनिषा जाधव,जिल्हा उपाध्यक्षा शिवमती मनिषा गायकवाड, जिल्हा कोषाध्यक्षा शिवमती शुभांगी क्षीरसागर, जिल्हा प्रवक्ता शिवमती सुवर्णा घोरपडे, तालुकाध्यक्षा श्रीमती शारदा चव्हाण,तालुका उपाध्यक्ष शिवमती आशा सावंत,तालुका सचिव शिवमती पूनम सुसलादे .
तालुका कार्याध्यक्ष शिवमती सुवर्णा क्षीरसागर,शिवमती कल्पना चव्हाण,शिवमती सुवर्णा शेंडगे (संघटक)तसेच कोषाध्यक्ष शिवमती संगीता जगदाळे, संघटक शिवमती अलका कदम,संघटक शिवमती सुनिता सर्वगोड उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा