*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
-----मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाटनिमगाव येथील श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय व देवराई फाउंडेशनचे संस्थापक सुशीलकुमार शिंदे व विजय शिंदे परिवाराचा पर्यावरण संतुलन करण्यासाठी दीड एकर क्षेत्रामध्ये देवराई निर्मितीचा उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय आहे असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
मंत्री मोहोळ पुढे म्हणाले, सांस्कृतिक, पर्यावरणीय, आरोग्य दायी, आध्यात्मिक परंपरा संवर्धन करण्यासाठी देशी, औषधी गुणधर्म असलेली तसेच डेरेदार सावली देणाऱ्या झाडांचे संवर्धन करण्याचा स्तुत्य उपक्रम शिंदे बंधू यांनी सर्व जिव्हाळ्याच्या शक्ती एकत्र करून राबविला आहे. त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येक गावात, शहरात देवराई निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आज वाढत्या नागरीकरणामुळे ‘देवराई’ ही संकल्पना अधिक महत्त्वाची ठरते. स्थानिक जैवविविधतेचं संवर्धन, पाण्याचे संरक्षण आणि हवामान बदलाचा मुकाबला, या सगळ्या दृष्टीने देवराईचे अमूल्य महत्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक तरी देवराई जपली, तर भविष्यासाठी आपण खऱ्या अर्थाने हरित वारसा निर्माण करू शकू ! वृक्षलागवड ही केवळ एक मोहीम नसून, तर ती निसर्गाशी आपली असलेली नाळ जपण्याची एक जबाबदारी आहे असे मत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
भाजप नेते प्रवीण माने म्हणाले, भागवत शिंदे उर्फ भाऊंचे कुटुंब हे अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. या कुटुंबातील दोन मुले सुशीलकुमार शिंदे व विजय शिंदे यांना भागवत शिंदे यांनी चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले. दोन्हीही मुलांनी आपापल्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करून आपल्या कुटुंबाला नावलौकिक मिळवून दिला आहे. त्यांचा देवराईचा उपक्रम आदर्श व दिशादर्शक आहे.
यावेळी आकाश कांबळे, गजानन वाकसे, मारूती वनवे, तानाजी थोरात, माऊली वाघमोडे, राजू जठार, राम आसबे, किरण गानबोटे, रमेश खारतोडे, आबासाहेब थोरात, रवींद्र सरडे, स्वप्निल सावंत, कैलास कदम, शांतीलाल शिंदे, हनुमंत जाधव, अमोल चंदनशिवे, सुभाष गायकवाड, दिलीप पाटील, अमोल इंगळे, व ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट : पक्षी उडे आकाशी चित त्याचे पिल्लापाशी'...!!
"पक्षी उडे आकाशी चित्त त्याचे पिल्लापाशी' या उक्तीनुसार मी देशा मध्ये कुठेही फिरलो तरी शेवटी मी पुण्यामधून जातो, माझे शहर व माझ्या जिल्ह्याबद्दल माझ्या मनामध्ये आत्मीयता आहे असे मंत्री मोहोळ यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
सोनाई दूध या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या दुधसंघाचे संचालक प्रवीण माने यांच्या भाजप प्रवेशाने भारतीय जनता पक्षाची इंदापूर मध्ये ताकद वाढली असून प्रवीण माने हे आगामी काळात इंदापूर व जिल्ह्याचा राजकारणातील प्रमुख चेहरा असतील या शब्दात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रवीण माने यांचे कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा