*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- विषमुक्त सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबवून पिकांचे अधिकचे उत्पन्न घेवून आर्थिक उन्नती घडवणाऱ्या शेतकऱ्याचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती कृषी विभाग यांच्या वतीने सन २०२४ - २५ मध्ये प्राजक्ता केशव बोडके यांना प्रगतशील शेतकरी म्हणून मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे, माजी सरपंच श्रीकांत बोडके, ज्योती बोडके, प्रगतशील शेतकरी केशव बोडके आदि मान्यवर उपस्थित होते.
मंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात शेती व शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. त्यामधून आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होवून अनेक कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यात मदतीचा झाला आहे. आता पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही शेतीतून आर्थिक उन्नती करत असल्याने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
प्रगतशील शेतकरी केशव बोडके म्हणाले, देशी गोवंश सांभाळून त्याच्या मल व मुत्रापासून स्लरी तयार करून पिकांना सोडण्यात येते. बॅक्टेरीया, गांडूळ खताची निर्मिती करून पिकांना सोडून सेंद्रिय विषमुक्त शेतीचा प्रयोग अनेक वर्षांपासून राबवत आहे.
शासनाने माझा प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मान केल्यामुळे शेतीत अधिक जोमाने काम करण्याचे प्रोत्साहन दिले आहे असे प्रगतशील शेतकरी प्राजक्ता केशव बोडके यांनी यावेळी सांगितले.
फोटो - इंदापूर पंचायत समितीत मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्राजक्ता केशव बोडके यांचा सन्मान करण्यात आला.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा