Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १० जुलै, २०२५

*सुख दुःखाच्या वळणावर मैत्रीचे- औदार्य राखणारे -माझे मार्गदर्शक, माझे गुरु --जब्बारभाई बारसकर*

 


*इकबाल बाबासाहेब मुल्ला (पत्रकार)*

 *सांगली* 

 *मो:-8983 587 160

*आज गुरुपौर्णिमा !*

ते पत्रकार *इकबाल मुल्ला* कोणाचेही "ऐकणार" नाहीत "जग" इकडचं तिकडं होईल,पण ते तुमच्या *विरोधातील* कारवाई करणार म्हणजे करणारचं, ते *लेख* लिहिणार म्हणजे लिहिणारच, पण सांगलीतील *गणपती पेठ* जवळील बालाजी मंदिर येथील "हॉटेल कॅफे रॉयल" शेजारी *बारसकर वजनकाट्याचे* दुकान आहे,तेथे "जब्बार बारसकर" नावाचे व्यक्ती आहेत. इकबाल *ऐकतात* ते फक्त या माणसाचे, कोणीही सांगूदे ते ऐकत नाहीत, तुम्ही या *जब्बारभाईंना* सांगा...! 

सांगली जिल्ह्यातील अनेक लोकांच्या याच आणि अशाचं प्रकारच्या *प्रतिक्रिया* माझे गुरु ,माझे *मार्गदर्शक* जब्बारभाई बारसकर यांचे महत्व *अधोरेखित* करण्यासाठी पुरेशा आहेत.

होय ! या "*जगात"* केवळ आणि केवळ ज्यांचा - 

*शब्द* माझ्यासाठी *प्रमाण* आहे,ज्यांचा शब्द मी "खाली" पाडत नाही ते आहेत जब्बारभाई ! 

माझ्या आयुष्यातील 40 वर्षाच्या कालखंडाचा आलेख आणि त्याचे *साक्षीदार* आहेत जब्बारभाई ! *सुख - दुःखाच्या* वळणावर,मैत्रीचे "औदार्य" दाखवत, मला सतत "मार्गदर्शन" करणारे माझे मोठे बंधू -हितचिंतक - मित्र , माझे गुरु म्हणजेच *जब्बारभाई* ! त्यांच्या फॅमिलीशी माझ्या कुटुंबाचे *100 वर्षांपासून* असणारे हितसंबंध - *ऋणानुबंध* वर्षागणिक अधिक "दृढ" होतं आहेत.

त्यांची सुपुत्र *अलबतीन ,अरसलान आणि अजेन* यांच्यामध्ये देखील तितकीच "सहृदयता" आहे जी त्यांनी *जपली* आहे. त्याशिवाय "अलबतीन" माझा *मानसपुत्र* म्हणून महाराष्ट्रात "परिचित" आहेच.

जसा "कृष्ण" आणि "सुदामा"" होते,तसेच जब्बारभाई माझ्यासाठी माझे "आधारस्तंभ" आहेत,माझे हितचिंतक आहेत,माझे "गुरुस्थानी" आहेत, माझ्यासाठी *श्रीकृष्ण* समान"आहेत.आणि मी त्यांचा चेला - आणि *सुदामा* आहे. माझ्या या "ग्रेट" गुरुसाठी आणखी काय सांगू ?? 

*परमेश्वर* त्यांना निकोप- "निरोगी" आरोग्यसंपन्न जीवन देवो,त्यांच्या सर्व "इच्छाआकांक्षा" पूर्ण करो,ते *एव्हरग्रीन* आहेतच, दिवसेंदिवस ते आणखी "तरुण" होवोत होवोत ही "परमेश्वरचरणी" प्रार्थना ! 



*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा