*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस - विझोरी येथे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संलग्न रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूजच्या कृषीकांन्यानी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाला कृषी सहाय्यक-.अण्णासाहेब नलवडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमात विझोरी पोल्ट्री फार्म येथील १५ एकर क्षेत्रात ५० करंज,आवळा, शिशू,बांबू,जांभूळ,कडुनिंब,वड, ताग इत्यादी प्रकारची झाडे लावण्यात आली.या प्रसंगी कृषीकन्यांनी सांगितले की जैवविविधतेचे संतुलन ही काळाची गरज असून ,निसर्गाची किमया सर्वांनी समजून घेऊन स्वच्छ परिसर,हरित परिसर,सुंदर परिसर ही संकल्पना पुर्णत्वास न्यावी जेणेकरून स्वस्थ व निरोगी व्यक्ती -समाज-राष्ट्र निर्मितीसाठी मदत होईल.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि आपल्या सभोवतालचे वातावर स्वच्छ आणि प्रदूषण विरहित ठेवण्यासाठी झाडे लावणे खूप महत्वाचे आहे.
याचे मार्गदर्शन कृषीकन्या वैभवी ढेंबरे, वैष्णवी शिंदे, शिवानी पावले, प्रीती फडतरे,प्रणोती कोरे,ऋतुपर्णा सावंत,अमृता बांदल,तेजश्री शिंदे यांनी केले.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी.नलावडे, प्रा.एस.एम एकपुरे (कार्यक्रम समन्वयक),प्रा.एस.एम चंदनकर (कार्यक्रम अधिकारी),प्रा.एच.एस.खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा