Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १० जुलै, २०२५

*राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश दादा पाटील यांची आगामी निवडणुका संदर्भात अकलूज येथे कार्यकर्त्यांशी चर्चा.*

 


*अकलूज - प्रतिनिधी*

 *बाळासाहेब गायकवाड*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष - उमेशदादा पाटील यांनी अकलूज चे माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकदादा गायकवाड यांच्या समिंद्रा निवास स्थानी सदिच्या भेट दिली त्यावेळी त्यांचे पक्षाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकी संदर्भात तालुक्यातील कार्यकर्त्यांशी सखोल चर्चा करण्यात आली आणि अकलूज नगरपरिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी अशोकदादा गायकवाड, राहुल ढेरे पाटील आणि अकलूज शहर अध्यक्ष राजीव गायकवाड यांच्याकडे सुरेश आबा पालवे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शना खाली दिली असून तालुक्यात आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य करण्याचे आव्हान केले असून मी व आपला पक्ष संपूर्ण माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे उमेशदादा हे सांगण्यास विसरले नाहीत. तसेच राजकीय गोठातुन मिळालेल्या माहितीनुसार माळशिरस तालुक्याचा सदरच पक्षाचा अध्यक्ष बदलण्याच्या हालचालीना वेग आला असून आत्ताचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल ढेरे पाटील यांची माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणून निवड होण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जाते. कारण ते नेहमीच प्रस्थापित्यांच्या विरोधात उघड पणे भूमिका घेतात त्यावेळी सोलापूरचे शिवानंद पाटील तालुका ओबीसी सेल चे अध्यक्ष संजय मगर माजी कृषी अधिकारी व अकलूज शहर संघटक अरविंद पगारे तालुका युवक उपाध्यक्ष तेजस उबाळे, सुनील आप्पा गायकवाड, मोहनराव कांबळे आणि उमेशदादा पाटील यांच्यावर व पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा