*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- आझाद समाज पार्टीच्या (कांशीराम) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी गिरवी (ता. इंदापूर) येथील कांतीलाल ठोकळे यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने इंदापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला.
आझाद समाज पार्टीचा नुकताच एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पार्टीचे राज्याच्या उपाध्यक्षा व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ. मानसी पवार यांनी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी कांतीलाल ठोकळे यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार केला आहे. यावेळी केंद्रीय प्रभारी महाराष्ट्र राज्य गौरीप्रसाद उपासक, महाराष्ट्र राज्य प्रभारी रूपेश बागेश्वर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीष साठे, पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नगिना लोकसभेचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली कांतीलाल ठोकळे यांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संकल्पनेतील व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच मान्यवर कांशीराम यांच्या 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' ही समानतेची विचारधारा पुढे नेण्यासाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने निवड करण्यात आली आहे.
कांतीलाल ठोकळे निवडीनंतर बोलताना म्हणाले की, आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नगिना लोकसभेचे खासदार चंद्रशेखर आझाद यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी दिलेली जबाबदारीच्या माध्यमातून पार्टीची तळागळात ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे. तसेच गोरगरीब, मागासांच्या विकासासाठी तसेच जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
फोटो - कांतीलाल ठोकळे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा