अकलूज--- प्रतिनिधी
केदार लोहोकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
धनशैल्य शिक्षण संस्था अकलूज संचलित धनशैल्य विद्यालय, गिरझणी येथे जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर आयोजित केलेल्या माळशिरस तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धो नुकत्याच पार पाडल्या.या स्पर्धेचे उद्घाटन माळशिरस तालुका विस्तार अधिकारी सौ.सुषमा महामुनी यांच्या हस्ते झाले.यावेळी नवनाथ भानवसे (डाटा ऑपरेटर),रणजीत लोहार (तालुका क्रीडा समन्वयक),संस्थेचे अध्यक्ष मनिष गायकवाड,उपाध्यक्षा सौ.पल्लवी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे सौ.सुषमा महामुनी यांनी आपल्या मनोगतातून कराटेसारख्या खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,आत्मविश्वास व शारीरिक तंदुरुस्ती विकसित होते, असे प्रतिपादन केले.या स्पर्धेत १४,१७ व १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींनी सहभाग घेतला. तालुक्यातील विविध शाळांमधून आलेल्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ, कौशल्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.यावेळी पंच म्हणून प्रकाश काशिद व संजय सपताळे यांनी काम पाहिले.या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी क्रीडा शिक्षिका सौ.रजनी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.श्रीनाथ विद्यालयाचे सचिन बोरावके यांनी नियोजनास मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनीता नरुटे व सौ.रेखा जागते यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.वर्षा पोटे यांनी केले.विविध शाळेतील क्रीडा शिक्षकांचा सन्मान आदेश टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आला.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता,चिकाटी व आत्मविश्वास वृद्धिंगत झाला. विजेत्या खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली असून पुढील यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा