Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

लोकनेते आर पी आय चे प्रदेशाध्यक्ष-" राजाभाऊ सरवदे" यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीपूर मध्ये शालेय गणवेश वाटप


 

श्रीपूर--बी.टी.शिवशरण.

लोकनेते आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित् श्री चंद्रशेखर विद्यालयात आरपीआयचे शहर अध्यक्ष गणेश सावंत यांनी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आरपीआयचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे होते सदर कार्यक्रमाला आरपीआयचे प्रदेश युवक उपाध्यक्ष के डी धाईंजे आरपीआयचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले आरपीआयचे युवक तालुकाध्यक्ष दशरथ नवगिरे जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले जिल्हा संघटक तुकाराम बाबर जिल्हा सचिव भारत आठवले तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर तालुका उपाध्यक्ष बापू पोळके आरपीआयचे संजय खरे रमेश भोसले माजी जि प सदस्य रामहरी नवगिरे महादेव आठवले प्रथमेश लोंढे गुडम भालशंकर नागेश काटे पत्रकार बी टी शिवशरण इत्यादी उपस्थित होते यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले जिल्हा सचिव भारत आठवले प्रदेश युवक उपाध्यक्ष के डी धाईंजे प्राचार्य पांडुरंग बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी सांगितले की लोकनेते आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीपूर शहर अध्यक्ष गणेश सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी जो सामाजिक बांधिलकी जोपासत गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत म्हणून शालेय गणवेश वाटप करुन एक चांगला आदर्श निर्माण केला आहे देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की खूप अभ्यास करा आई वडीलांच्या कष्टाचे मोल जपा भविष्यात तुम्ही मोठे अधिकारी प्रतिष्ठित व्यक्ती आयपीएस अधिकारी म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करावा शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे ते प्राशन करणारा मोठा माणूस बनतो ही शिकवण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपाने सर्व जगाने अनुभवलं आहे तेव्हा संकट कठीण परिस्थितीत जो धिराने सामोरे जातो तोच जिवनात यशस्वी होतो प्राचार्य पांडुरंग बनसोडे यांनी सांगितले की शालेय शैक्षणिक वर्षात श्रीपूर मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे वतीने तीन मोठे कार्यक्रम शाळेत घेऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दप्तर वह्या पुस्तके तसेच गरजू विद्यार्थीनींना सायकल वाटप व आज गणवेश वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे असेच सहकार्य मदत भविष्यातही करावी असे त्यांनी आवाहन केले यावेळी प्रशालेचे प्राचार्य पांडुरंग बनसोडे सर पर्यवेक्षक गुरव सर संस्था मान्य पर्यवेक्षक शेंडे सर लिपिक हनुमंत मोरे सर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले सुत्रसंचलन घुगे सर व आभार काळे सर यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा