*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
मोहिते पाटील घराण्याची सामाजिक राजकीय सांस्कृतिक वैचारिक शैक्षणिक अध्यात्मिक धार्मिक वाटचालीत या घराण्याची महाराष्ट्रात मोठी वाटचाल व परंपरा आहे या घराण्यातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे पश्चात त्यांचे राजकीय वारसदार विजयसिंह मोहिते पाटील यांना मोहिते पाटील परिवार व माळशिरस तालुक्यातील जनतेने स्विकारले आहे विजयसिंह मोहिते पाटील यांनीही महाराष्ट्राचे नेतृत्व करताना आपल्या घराण्याचा लौकिक आदर्श परंपरा उंचावत आपल्या कर्तृत्वाचा नेतृत्वाचा आलेख उंचावत ठेवला आहे विजयसिंह मोहिते पाटील यांचे नंतर म्हणजे त्यांच्या हयातीत मोहिते पाटील या सहा भावांचे ज्येष्ठ पुत्र हे राजकारणात सक्रिय राहून ते चांगलेच स्थिरावले आहेत यामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील धवलसिंह मोहिते पाटील शिवतेजसिंह मोहिते पाटील अर्जुन सिंह मोहिते पाटील यांनी जिल्ह्यात सामाजिक राजकीय क्षेत्रात आपले बस्तान बसवले आहे मात्र जयसिंह उर्फ बाळदादा यांचे चिरंजीव संग्रामसिंह मोहिते पाटील हे अकलूज ग्रामपंचायत व अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत झाले होते मात्र त्यांनी आपली राजकीय भुमिका मर्यादित ठेवली आता गेल्या वर्षभरात बाळदादा यांचे नातू असलेले सयाजीराजे मोहिते पाटील हे माळशिरस तालुक्यात पुर्ण सक्रिय झाले आहेत त्यांच्या वयाचा आवाका पहाता अत्यंत शिस्तप्रिय लोकप्रिय मनमिळाऊ तसेच संघटन कौशल्य बुध्दिमत्ता असलेल्या सयाजीराजे मोहिते पाटील यांनी थोड्या दिवसात आपल्यातील सामाजिक राजकीय नेतृत्व कर्तृत्वाचे पैलू सिध्द केले आहेत अत्यंत समजदार स्वभाव मुद्देसूद भाषण तरुणांना साद घालणारे विचार यामुळे त्यांनी आपले आजोबा जयसिंह उर्फ बाळदादा यांचे राजकीय वारसदार असल्याचे दाखवून दिले आहे कमी वयात त्यांनी तालुक्यातील युवा वर्गाला आकर्षित केले आहे सयाजीराजे निश्चितच ते राजकीय पल्ला मोठा गाठतील अशी रास्त अपेक्षा आहे आणि ते पुर्ण करतील असा विश्वास माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांचे समर्थकांना आहे एक संयमी सोशीक व ध्येयवाद जागृत असणारे युवा नेते म्हणून त्यांनी माळशिरस तालुक्यात सयाजीराजे युवक मंच या संघटनेच्या माध्यमातून युवकांचे संघटन ताकद वाढवली आहे सर्वांशी आपुलकी जिव्हाळा संवाद साधून युवकांच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक विधायक प्रश्न जाणून घेऊन ते प्रामाणिक सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत हा विश्वास युवकांना असल्यानेच सयाजीराजे यांचे नेतृत्व युवक स्विकारताना पहायला मिळत आहे मोहिते पाटील घराण्याचे वलय परंपरा व नावलौकिक वाढवून ते नक्की राज्याच्या राजकारणात अग्रेसर असतील या बाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही बाळदादा यांचे नातू असलेले सयाजीराजे हे मोहिते पाटील यांचे घराण्याचे वलय नाव प्रतिष्ठा यामुळे लोकप्रिय नाहीत तर त्यांनी स्वतः चे कर्तृत्व नेतृत्व आपल्या स्वभावाने सिध्द केले आहे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक वाडवडिलांची म्हण आहे या म्हणी चे प्रत्यय सयाजीराजे या रुपाने माळशिरस तालुक्यात तुम्ही आम्ही अनुभवत आहोत
श्रीपूर---बी.टी.शिवशरण.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा