संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणी व शहर, जिल्हा कार्यकारणीत मध्ये नूतन पदाधिकारी झालेल्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचा सत्कार देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे करण्यात आला.
या सत्कार कार्यक्रमात माजी आमदार प्रकाश यलगुलवार, सौ. अलकाताई राठोड, विनोद भोसले, श्रीमती शाहीनताई शेख, अँड. रविकिरण कोळेकर, सुरेश हावळे, राहूल वर्धा, श्रीशैल रणधिरे, भारत जाधव, सुशिल बंदपट्टे, सुबोध सुतकर, संतोष सोनवणे, अब्दुल खलीक मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयास भेट दिली असता जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
*देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे*
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार व नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा. आज कठीण काळात पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर आली असून रात्रंदिवस काम करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहेत, त्यासाठी सज्ज व्हा.
१९७८ मधील परिस्थितीचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, इंदिराजी गांधींचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी काँग्रेस सोडली होती. मात्र सामान्य कार्यकर्त्यांनी 'पहले रोटी खायेंगे, इंदिरा को लायेंगे' या घोषणेवर ठाम राहून लढा दिला आणि काँग्रेस पुन्हा प्रचंड बहुमताने सत्तेवर आली.
आजची परिस्थिती सांगताना त्यांनी सरकारवर टीका केली. शेतकरी आणि सर्वसामान्य जनता अडचणीत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. जाती-धर्मात भांडणे लावून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाची विचारधारा अधोरेखित करत शिंदे म्हणाले की, काँग्रेसने सर्वधर्मसमभावाची, जनतेच्या प्रश्नासाठी लढण्याची भूमिका, कधीच सोडली नाही. त्यामुळे देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही.
यावेळी त्यांनी पंडित नेहरूंचे उदाहरणही दिले. "जसे लहान मूल उभे राहण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा पडते पण पुन्हा उठते, तसेच आपल्यालाही पराभवाने खचून चालणार नाही. एकदा उभे राहिलो की पुढे ताठ मानेने चालता येते," असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
शेवटी सुशीलकुमार शिंदे यांनी आवाहन केले की, "शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे व जिल्हाध्यक्ष सातलिंग शटेगार यांनी सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आगामी निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागावे," असे सांगत पक्षाला बळकट करण्याचे आवाहन केले.
🟣 *काँग्रेसचे भविष्य उज्ज्वल, मात्र त्यासाठी संघर्ष अनिवार्य – माजी आमदार प्रकाश यलगुलवार*
यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार म्हणाले की, नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला असून त्यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. आज पक्ष संकटातून जात आहे, त्यामुळे पक्ष वाढीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. ते पुढे म्हणाले की, ‘दीवार’ सिनेमात अभिताभ बच्चन शशी कपूरला विचारतो – “मेरे पास गाडी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है?” त्यावर शशी कपूर म्हणतो – “मेरे पास माँ है.” त्याचप्रमाणे आपल्या काँग्रेसकडे सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यासारखे सक्षम नेतृत्व आहे. देशात राहुल गांधी यांचे झंझावत सुरू असून त्याला प्रचंड जनसमर्थन लाभत आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. काँग्रेसचे भविष्य उज्ज्वल आहे, मात्र त्यासाठी संघर्ष अनिवार्य आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस निश्चितच विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*सोलापूर पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला करण्यासाठी कटिबद्ध : सातलिंग शटगार*
यावेळी जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार म्हणाले की, माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला जिल्हाध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब आणि खासदार प्रणितीताई शिंदे यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. या पदाला न्याय देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन. काँग्रेसची संघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीसाठी मी जिल्हाभर दौरा सुरू केला आहे. कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि जनतेच्या पाठिंब्याच्या बळावर सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसचा भक्कम बालेकिल्ला करण्यासाठी मी जीवाचे रान करणार आहे.
🟣 *भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, रात्र वैऱ्याची आहे, सतर्क रहा – चेतनभाऊ नरोटे*
यावेळी बोलताना चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, राहुलजी गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतचोरीचा फर्दाफाश केला असून त्यांच्या वोटर अधिकार यात्रेला प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. सोलापूर महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी दारात येऊन ठेपल्या आहेत. भाजप सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकते, रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे आपणही सतर्क राहणे अत्यावश्यक आहे. मतदान याद्यांची छाननी करा, प्रभाग रचनेत काही अडचण असल्यास संपर्क साधा आणि मतदारसंघातील जनतेशी सातत्याने संवाद ठेवा.
यावेळी मा. नगरसेवक रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, दत्तू बंदपट्टे, अशोक निंबर्गी, प्रा. सिद्राम सलवदे , उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, राधाकृष्ण पाटील, अशोक देवकते, सुरेश शिवपूजे, अँड. संजयजी गायकवाड, लक्ष्मण भोसले, प्रमिला तुपलवंडे, रमेश हसापुरे, सिद्राम पवार, भिमराव बंडगर, अँड. गजेंद्र खरात, तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, संजय पाटील, राहूल घुले, नंदा कांबळे, सुदर्शन अवताडे, देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, जुबेर कुरेशी, युवराज जाधव, भीमाशंकर टेकाळे, अँड केशव इंगळे, तिरुपती परकीपंडला, नागनाथ कदम, बसवराज म्हेत्रे, अंबादास गुत्तीकोंडा, पशुपती माशाळ, हणमंतू सायबोलू, अनिल मस्के, लक्ष्मीकांत साका, मधुकर आठवले, सचिन गुंड, संजय पाटील, गिरीश शेटे, अँड. जीवनदत आरगडे , जे. टी. जाधव, तानाजी जगदाळे, शिवानंद बिराजदार, श्रीमती नंदाताई कांबळे, सैफन शेख, कृष्णदेव वाघमोडे, प्रशांत कांबळे, इलियास शेख, नाथा ऐवळे, लखन गायकवाड, विवेक कन्ना, संजय गायकवाड, शिवशंकर अंजनाळकर, सागर उबाळे, NK क्षीरसागर, गिरिधर थोरात, अमोल भोसले, हेमाताई चिंचोलकर, शोभा बोबे, सुमन जाधव, वीणाताई देवकते, रेखा बिनेकर, शरद गुमटे, सुभाष वाघमारे, किरण सुर्वे, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, असलम शेख, गेनसिध्द मोटे, कार्तिक चव्हाण, शशिकांत जाधव, प्रकाश माने, शाहू सलगर, सलीम मनुरे, रुकैयाबानू बिराजदार, अनिल जाधव, मल्लेशी सूर्यवंशी, पप्पू गारे, भीमराव शिंदे, नूर अहमद नालवार, राजेश झंपले, तौसिफ शेख, सुशीलकुमार म्हेत्रे, राजू कलेकरी, जब्बार शेख, हणमंतू रूपणर, जितराज गरड, मोहसीन फुलारी, शरद फुंदे, महेंद्र शिंदे, अभिलाष अच्युगटला, चंद्रकांत पात्रे, साई शिंदे, सुशीला रावडे, निशा मरोड, धनलक्ष्मी देशमाने, जॉनी आनंद, मुबिन मडळे, इस्माईल शेख, इरफान पटेल, सुजाता भंडारे यांच्यासह शहर व. जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा