संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे त्या संदर्भात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय मागणीसंदर्भात कार्यवाही करण्याबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे विनंती केली आहे
पत्राद्वारे केलेली मागणी असे की,
आपल्याला विदित आहे की, मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक न्याय व समान संधी मिळविण्यासाठी आरक्षणाची मागणी करत आहे. सध्या या मागणीच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू असून मा. श्री. मनोज जरांगे पाटील हे शांततामय व लोकशाही मार्गाने या लढ्याचे नेतृत्व करीत आहेत. मराठा समाजाच्या न्याय्य मागणीला मी खासदार म्हणून पूर्ण पाठिंबा दर्शवतो.
राज्यातील मराठा समाजातील लाखो तरुण, विद्यार्थी व शेतकरीवर्ग या मागणीशी निगडीत असून त्यांच्या भविष्याचा प्रश्न आज समोर उभा आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नावर संवेदनशीलतेने व तातडीने निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने माझी आपणास नम्र विनंती, सामाजिक समतेच्या दृष्टीने मराठा आरक्षणाच्या विषयाला प्राधान्य देऊन त्वरित कार्यवाही कराल, अशी अपेक्षा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त आहे.
आपला,
(धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील)
शिवराई वाडा, सरसेनापती हंबीरराव मोहिते नगर, लेन नंबर 6, यशवंतनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर (महाराष्ट्र) 413118 मोबाईल: 90495 00005
कार्यालय : 02185 225025, 77450 00005 ई-मेल: d.mohitepatil@sansad.nic.in





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा