*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षी काॅलनी शाखेचे वतीने अकलूज येथील जिल्हा परिषद २१खोल्या शाळे मधील मुला मुलींना २००० वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर सर्वांना खाऊ व फळे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीरभाऊ रास्ते उपस्थित होते.
यावेळी सुधीर रास्ते यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर उपस्थितांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास जनसेवा संघटनेचे नातेपुते शहराध्यक्ष व दै.पुढारीचे पत्रकार सुनील गजाकस जनसेवा संघटनेचे जनसेवा गव्हर्नींग कमिटीचे सदस्य रघुनाथ साठे, बाबाजी खंडागळे,सागर खंडागळे, वैभव लोखंडे,मुख्याध्यापिका. सुकुमारी शंकर अंगुले, गायकवाड सर, केसकर सर,कोरे सर,नागणे सर यांचे सह अनेक कार्यकर्ते विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा