*अकलुज --प्रतिनिधी*
*बाळासाहेब गायकवाड*
*टाइम्स 45 न्युज मराठी
सामाजिक न्याय मंत्री नामदार संजयजी शिरसाट माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर श्रीराम निवासस्थानी आले असता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळशिरस तालुक्याच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अकलूज येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीग्रहासाठी जागा उपलब्ध करून सुसज्ज इमारत उभी करावी.या विषयासाठी माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नामुळे मंत्रिमहोदयांनी वस्तीगृहाचा प्रस्ताव तत्काळ सादर करा,
अशा समाज कल्याण आयुक्त सोनवले मॅडम यांना जागेवर लेखी सूचना केल्या.दरम्यान
दलित आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचाराचे प्रमाण कमी रोखयासाठी एससी,एसटी अत्याचार प्रबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी,
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे तसेच महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळासह सर्वच मागासवर्गीय महामंडळाची कर्ज माफ करावीत,
सामाजिक कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक देणार असल्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी,मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मॅट्रिकोत्तर व महाविद्यालय शिष्यवृत्ती वेळेत द्यावी,
दलित आदिवासी समाजाच्या सामाजिक उत्थानासाठी असलेला निधी इतरस्त वळवू नये, यासाठी बजेटचा कायदा करावा,वेळापूर गाव पालखी मार्ग महामार्गावरील असल्याने या ठिकाणी सुसज्ज बस स्थानक करावे,वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय मध्ये रूपांतर करावे, वेळापूर पोलीस स्टेशन साठी पोलीस वसाहत करावी,
लंपी आजारामुळे मृत पावलेल्या गाईंना पूर्वीप्रमाणे अनुदान मिळावे, बाधित जनावरांवरती मोफत उपचार करावेत, इत्यादी मागण्यांचे निवेदन मंत्री महोदय शिरसाठ यांना देण्यात आले.
यावेळी मा.आमदार राम सातपुते,
जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटक एस.एम.गायकवाड,युवक आघाडी राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे,तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे,
युवक तालुका अध्यक्ष दशरथ नवगिरे,
सरचिटणीस प्रवीण साळवे,तालुका कोषाध्यक्ष-समीर सोरटे,तालुका उपाध्यक्ष संतोष कांबळे,तालुका उपाध्यक्ष दिलीप सरतापे,तालुका सचिव दादासाहेब सरतापे,युवक कार्याध्यक्ष विनोद रणदिवे,गौतम वाघंबरे,प्रशांत साळवे,उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा