*मुख्यसंपादक---हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448
बार्शी येथील जे वाय येडशीकर सोशल मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ऑल मुस्लिम वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष जहांगीर याकूब बागवान (येडशीकर) यांनी दिली आहे
या वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जम जम फंक्शन हॉल, जे वाय येडशीकर वॉटर सप्लायर, जम जम एक्वा, मलिक चौक बार्शी जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे
आजच्या धावपळीच्या आणि खर्चिक काळात मुस्लिम समाजातील मुला-मुलींना योग्य जोडीदार शोधणे कठीण झाले आहे मुस्लिम समुदायाची ही गरज समजून घेऊन वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे
या वधू वर परिचय मेळाव्यात तुम्ही तुमच्या अविवाहित मुला मुलींचा आणि घटस्फोटीत मुला मुलींचा बायोडाटा आणि फोटो सोबत आणावेत या मेळाव्यात तुम्हाला तुमच्या पसंतीच्या मुस्लिम नात्याच्या बायोडाटा आणि फोटो मुला मुलींना पाहता येईल यामुळे तुमचा मुला मुलींसाठी चा नातेसंबंध बनवणे तुमच्यासाठी सोपे होईल
*मेळाव्यात येणाऱ्या समाज बांधवांसाठी सूचना*
1) ज्यांच्याकडे फोटो बायोडाटा आहे त्यांनाच मेळाव्यात प्रवेश दिला जाईल
2) हा मेळावा मोफत आहे आणि कोणत्याही एजंटला त्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे
3) या वधू वर परिचय मेळाव्यास परगावहून येणाऱ्या समाज बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे
*संपर्कासाठी*
*जे वाय येडशीकर सोशल मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट--अध्यक्ष , जहांगीर याकूब बागवान (येडशीकर)*
*मो :--9881 629 757*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा