नळदुर्ग ---प्रतिनिधी रहेमान शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
धाराशिव (उस्मानाबाद) कळंब मतदारसंघाचे विद्यमान आमदार-" कैलास दादा पाटील "यांनी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग वागदरी गुजणूर शहापूर निलेगाव इत्यादी परिसरात अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी आणि तातडीने पंचनामे करून कार्यवाही करावी आणि मोबदला लवकर मिळावा असे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले
स्वतःचा मतदार संघ धाराशिव कळंब सह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात फिरून जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा जाणून विचारपूस करून केवळ बांधावर न थांबता प्रत्यक्ष शेतामध्ये पाण्याचा आणि चिखलात जाऊन पिकांची पाहणी केली
याप्रसंगी दिलीप पाटील, महादेव बिराजदार ,काशिनाथ काळे, बंडू नाना पाटील, सचिन पाटील, व्यंकटराव पाटील, दिलीप जोशी ,राजेंद्र पाटील, राजेंद्र जाधव, सरदारसिंग ठाकूर ,महेश घोडके, बालाजी ठाकूर ,प्रताप ठाकूर ,अझमुद्दीन शेख, दत्ता पाटील ,इत्यादी या परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा