संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या उमरगा शाखेत अनोख्या अशा पुस्तक वाचणाऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पहिल्या आरतीचा मान उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांना देण्यात आला.
वाचनालयाच्या वतीने सण-वार, उत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवून वाचन संस्कृतीचा जागर केला जातो. भारतीय संस्कृतीत गणपतीला बुद्धीचा देव समजले जाते. म्हणूनच वाचनालयाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवात पुस्तक वाचणारा गणपती बसवून समाजात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न केले जातात. या गणपतीला पुस्तकांचा प्रसाद मागितला जातो आणि मिळालेली पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जातात. यंदाही गणपतीला पुस्तकांचा प्रसाद द्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त पुस्तकांचे संकलन होईल व मिळालेली पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देता येतील असे आवाहन वाचनालयाचे संस्थापक ऍड. शीतल चव्हाण यांनी केले.
यावेळी महावीर कोराळे, रजाक अत्तार, विजयकुमार नागणे, अप्पाराव गायकवाड, संजय पवार, विजय तळभोगे, डॉ. अजिंक्य पाटील, शिवकुमार पतगे, शैलेश नागणे, संजय सरवदे, सत्यनारायण जाधव, व्यंकट भालेराव, करीम शेख, राजू बटगिरे, गोपाळ वाडबुद्दे, ऍड. ख्वाजा शेख, प्रदीप मोरे, ऍड. अर्चना जाधव, शबाना उडचणे, ज्योती माने, बबिता मदने, किशोर बसगुंडे, कविता साळी, विजय चितली, युसूफ मुल्ला आदी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा