Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५

*लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह INDIA आघाडीच्या खासदारांनी SIR (विशेष पुनरावलोकन) आणि ‘वोट चोरी’ विरोधात आंदोलन करून जनतेच्या हक्कासाठी जोरदार आवाज उठवला.


आंदोलनादरम्यान खासदारांनी ठामपणे सांगितले की, भाजप आणि निवडणूक आयोग मिळून ‘वोट चोरी’ करत आहेत आणि हे सत्य आता देशासमोर आले आहे. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांनी आपल्या कार्यपद्धतीत पारदर्शकता ठेवली पाहिजे. राजकीय पक्ष हे जनतेचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांच्या शंका व तक्रारींना उत्तर देणे ही आयोगाची घटनात्मक जबाबदारी आहे. ही जबाबदारी टाळता येणार नाही.



‘मतदानाचा अधिकार’ हा भारतीय राज्यघटनेने दिलेला सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. लोकशाही पायदळी तुडविण्याचा कोणताही प्रयत्न INDIA आघाडी आंदोलन करून थांबवेल.


आघाडीच्या खासदारांनी इशारा दिला की, लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा