Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५

*प्रताप क्रीडा मंडळाच्या भव्य आट्यापाट्या स्पर्धेत' नेवरे'चा संघ विजेता*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर यांच्यावतीने आयोजित केलेल्या भव्य आट्यापाट्या स्पर्धेत

नेवरे (ता.माळशिरस) येथील जय शिवशंकर संघाने प्रथम क्रमांकाचे रोख रुपये ४४ हजार व मानाच्या चषकासह विजेतेपद पटकावले.तर कचरेवाडी चा जयबिरोबा संघ हा उपविजेता ठरला. त्यांना द्वितीय क्रमांकाचे रोख रुपये ३३ हजार बक्षिस देण्यात आले.

          शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेतील तृतीय क्रमांक जय हनुमान संघ, म्हैसगाव (ता. माढा) यांना रोख रुपये २२ हजार व चौथा क्रमांक श्रीकृष्ण संघ शिरढोण यांना रोख रुपये ११ हजार देऊन गौरविण्यात आले. तर उपांत्य फेरीतील श्रीराम संघ संगम, जय हनुमान तालीम संघ नेवरे, जय शंकर संघ नेवरे व शंकरआबा भुसनर संघ १५ सेक्शन यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

    कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या, मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची स्पर्धा मागील ४८ वर्षापासून सुरू आहे. या वर्षी ४९ संघ स्पर्धेत सहभागी झाले. पुढील वर्षी वेगळ्या भव्य स्वरुपामध्ये स्पर्धेचे आयोजन केले जाईल. स्पर्धेला मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील, युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांनी भेट दिली.

       स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनाचे सहाय्यक संचालक मिलिंद दीक्षित यांच्या हस्ते झाले. यावेळी दीपक खराडे पाटील, प्रदीप खराडे पाटील, महादेव अंधारे, सौ.आरती दीक्षित, दिपाली दीक्षित, अथर्व दीक्षित, उपाध्यक्ष पोपट भोसले पाटील, सचिव बिभीषण जाधव यांच्यासह मंडळाचे सर्व संचालक, सदस्य, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                 मिलिंद दीक्षित म्हणाले, मी शिक्षण प्रसारक मंडळाचा माजी विद्यार्थी व सेवक असून इथल्या मातीचा गुणधर्म म्हणूनच या पदावर कार्यरत आहे.खेळाडूसाठी आज शासनाने आरक्षण जाहीर केले, परंतु जयसिंह मोहिते पाटील यांनी तीस वर्षांपूर्वीच खेळाडूंना नोकरीस लावले आहे.

                 मी देशात कोठेही गेलो, तरी अकलूज हे नाव सांगितले की भेटलेले लोकच अकलूजचा इतिहास सांगू लागतात. यामध्ये १९७२ सालचे विजयदादांच्या लग्न सोहळ्यातील सहकार महर्षींनी दिलेले लक्ष भोजन, १९८४ सालची जयसिंह मोहिते पाटील यांनी आयोजित केलेली राष्ट्रीय स्पर्धा, २०हजार विद्यार्थी एकत्र मुक्कामी असलेली आनंदयात्रा, हनुमान तालीम लेझीम संघाच्या हलगीवर मुंबईत डान्स केलेला मायकल जॅक्सन अशा अनेक आठवणींना उजाळा मिळतो. अकलूज करांनी केलेला सत्कार हा माझ्या कुटुंबासाठी सुवर्णअक्षराने लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे. या कर्मभूमीचे मी पांग फेडू शकणार नसल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

  स्पर्धा प्रमुख यशवंत माने देशमुख यांनी प्रस्तावीक केले. स्पर्धा प्रमुख भीमाशंकर पाटील, बाळासाहेब सावंत, सुभाष चव्हाण यांचे सह क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

या स्पर्धेत पंढरपूर,माळशिरस, माढा, सांगोला, मंगळवेढा, करमाळा,शिरढोण, इंदापूर, आटपाडी, फलटण यासह विविध भागातील ४९ संघ सहभागी झाले होते. स्पर्धा पाहण्यासाठी विविध भागातून क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा