Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

*खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश-- मोहोळकरांना रक्षाबंधनाची भेट --सिद्धेश्वर एक्सप्रेस ला मोहोळ रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश*


मोहोळ, ता. ९ ऑगस्ट २०२५

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका व परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी, कोरोना काळापासून बंद असलेला मोहोळ रेल्वे स्थानकावरील एक्सप्रेस ( गाडी नंबर 12116 सोलापूर ते मुंबई व 12115 मुंबई ते सोलापूर

) गाड्यांचा थांबा पुन्हा सुरू करण्याची मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती ताई शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.


या मागणीचा सकारात्मक विचार करून, मोहोळ रेल्वे स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेसचा ( गाडी नंबर 12116 सोलापूर ते मुंबई व 12115 मुंबई ते सोलापूर ) थांबा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक प्रवासी, व्यापारी वर्ग, शेतकरी आणि भाविक नागरिक यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


मोहोळ आणि आसपासच्या भागात रेल्वे प्रवाशांची मोठी संख्या असून, तालुक्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत होती. हा थांबा सुरू झाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि वेळेची बचत होणार आहे.



या निर्णयाबद्दल मोहोळ तालुक्यातील सर्व स्तरांतील नागरिक, व्यापारी व शेतकरी यांनी खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल मनःपूर्वक आभार मानत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा