*उपसंपादक -नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
उद्धव ठाकरे साहेबांना राखी बांधून केले रक्षाबंधन साजरे
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील संगम गावातील ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ.जयश्री गणेश इंगळे यांनी रक्षा बंधनाच्या पवित्र सणानिमित्त थेट मुंबई गाठून ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना राखी बांधून औक्षण केले.
सौ.जयश्री इंगळे यांनी उध्दव ठाकरे साहेबांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि जनतेच्या सेवेसाठी सतत बळ मिळावे अशा शुभेच्छा दिल्या.राखी बांधल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भावूक होत जयश्री इंगळे यांच्या या आपुलकीच्या आणि विश्वासाच्या भावनेचे मनापासून कौतुक केले.रक्षा बंधन हा केवळ भाऊ-बहिणींचा सण नसून,नात्यांमधील विश्वास, आपुलकी आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून जयश्री इंगळे यांनी ‘मातोश्री’वर पोहोचून राखी बांधल्याने माळशिरस तालुक्यात आणि संगम गावात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.स्थानिक शिवसैनिकांनीही या कृतीचे स्वागत केले असून हा प्रसंग पक्षनिष्ठा आणि आत्मीयतेचे उत्तम उदाहरण ठरल्याची भावना व्यक्त केली जात आहे.यावेळी मातोश्री वरती रक्षाबंधन साजरे करीत असताना शिवसेना सचिव विनायक राऊत,युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा