Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

*अकलूज येथे प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

प्रताप क्रीडा मंडळ शंकर नगर अकलूज यांच्या वतीने रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे भव्य राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी दिली.

      मंडळाचे संस्थापक मा. श्री जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९७८ पासून कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळाने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, बालक्रीडा स्पर्धा, समूहनृत्य स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, रत्नाई मिठाई वाटप, रक्तदान शिबीर असे अनेक उपक्रम राबवले आहेत. याही वर्षी सालाबाद प्रमाणे दि. १७ ऑगस्ट रोजी भव्य राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यास्पर्धेस राज्यातील मुंबई, उस्मानाबाद, पंढरपूर, माढा, सांगोला, मंगळवेढा, करमाळा यासह विविध भागातील अनेक संघ सहभागी होतील. या स्पर्धेसाठी एकुण १ लाख ३० हजार रु.ची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकास ४४ हजार रु, द्वितीय क्रमांकास ३३ हजार रु, तृतीय क्रमांकास २२ हजार रु, चतुर्थ क्रमांकास ११ हजार रु व सन्मानचिन्ह , तर उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या ४ संघास प्रत्येकी ५ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे. 

 स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना मंडळाच्या वतीने भोजनाची सुविधा देण्यात येणार आहे. 



या स्पर्धेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी ९८६०३३१७१७/९३२५२५२९९६/ ९४२०७८२३२३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाचे सचिव बिभीषण जाधव यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील, स्पर्धा प्रमुख भीमाशंकर पाटील, यशवंत माने देशमुख, बाळासाहेब सावंत, सुभाष चव्हाण यांचे सह सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा