उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
शेतकरी मुस्लिम कुटुंबाने संस्कृतीशी एकरूप होत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
सण उत्सव हे केवळ एका धर्मापूर्ते मर्यादित नसतात तर ते सर्वांनी एकत्र येवून साजरे करायचे असतात .बैल हा शेतकऱ्याचा सोबती आहे त्याचे ऋण मानणे त्याच्या उपकारांची जाणीव म्हणजेच बैल पोळा.
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना आंघोळ घालून, फुलांनी सजवून, शिंगांना रंग लावून, घुंगरमाळा, झूल पांघरून हलगी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली जाते , शेतकऱ्याची मालकीणबाई आपल्या हाताने पुरणपोळीचा घास बैलाला खावू घालते.
बैल हा शेतकऱ्याचा केवळ कामाचा साथीदार नसून कुटुंबाचा सदस्यच मानला जातो. वर्षभर कडाक्याच्या उन्हात, पावसात, थंडीत शेतात राबणाऱ्या या जीवाला पोळ्याच्या दिवशी विशेष मान दिला जातो.
आमच्या संसारात बैल हा केवळ जनावर नाही, तर मुलासारखा आहे. त्याला पुरणपोळी खाऊ घालताना मन भरून आलं,” असे मालकीणबाईंनी सांगितले.
बैल आणि शेतकऱ्याचं नातं हे श्रमाचं, आपुलकीचं आणि मायेचं आहे. पोळ्याच्या दिवशी मालकिणीने दिलेला हा घास म्हणजे त्या नात्याला दिलेली खरी ओवाळणी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा