कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
कृत्रिम फुलांच्या वापरास कायदेशीर प्रतिबंध करावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी पर्यावरण पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की
कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालणेबाबत मा. मंत्री (रोहयो, फलोत्पादन व खारभूमी विकास) यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या उपस्थितीत दि. १७.०७.२०२५ रोजी विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. कृत्रिम फुलांच्या वापरामुळे फुल शेती धोक्यात येऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे तसेच हरीतगृहे नष्ट होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. याबबत शेतकऱ्यांनी व राज्यातील विविध लोकप्रतिनिधींनी देखील माझ्याकडे तक्रार करून कृत्रिम फुलांच्या वापरास कायदेशीर प्रतिबंध करणेबाबत आग्रही मागणी केलेली आहे.
एकंदरीत कृत्रिम फुलांच्या वापरामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी, शेतकरी हितास्तव पर्यावरण विभागामार्फत आवश्यक कायदेशीर उपाययोजना करावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे
(दत्तात्रय भरणे)
कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
प्रति,
मा.ना.श्रीमती पंकजाताई मुंडे,
मंत्री, पर्यावरण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा