विशेष प्रतिनिधी --एहसान मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9096837451
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा 150 व्या जयंती निमित्त सोलापूर जिल्हा पोलिस प्रशासन अंतर्गत, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, करमाळा व यशकल्याणी सेवाभावी संस्था पुणे यांचे संयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील निवडक शाळांतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी यशकल्याणी सेवाभवन करमाळा येथे शालेय चित्रकला व निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत दोन हजार हून अधिक विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते.
या चित्रकला स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट या शाळेतील विद्यार्थिनी "जकिया मतीन शेख" हिने चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल" IPS अजना कृष्णा"यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला
*विशेष*
*चित्रकला स्पर्धेत "जकिया मतीन शेख"हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल टाइम्स 45 न्यूज मराठी परिवाराच्या च्या वतीने हार्दिक अभिनंदन*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा