अकलूज--- प्रतिनिधी
केदार लोहोकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर मार्गदर्शित महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प या अंतर्गत माळशिरस तालुका अभियान कक्ष अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र यशवंत नगर या संस्थेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स्वयंवर मंगल कार्यालय पंचवटी येथे बचत गटाच्या सभासदाच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पोलीस सहाय्यक निरीक्षक विक्रम साळुंके,महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूरचे जिल्हा समन्वयक अधिकारी मन्सूरअली पटेल,सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी दिपक टेकाळे,राजकुमार पवार,बँक ऑफ इंडिया शाखा अकलूजचे शाखा व्यवस्थापक सोमगौनी बाला चंद्रुडू,कदम हॉस्पिटलच्या डाॅ.अंजली कदम,बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक महेश गव्हाणे,ओमशांती विश्व विद्यालयच्या ब्रह्मकुमारी अनिता करवा बहेनजी (बार्शी),शिवरात्री बहेनजी (अकलूज),प्रीती बहेनजी, विदर्भ कोकण बँकेच्या सौ.दिपाली घाडगे,पोलीस सहायक पांडुरंग जाधव,शाखा व्यवस्थापक उपजीविका विकास सल्लागार उमेश जाधव,हिंदुस्तान फीड्सचे डॉ.दर्शल गावडे,बालाजी सूर्यवंशी,जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सौ.शारदा चव्हाण सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष सौ.जयश्री एकतपुरे,सचिव सौ.राजश्री जाधव उपस्थित होते.
या सभेची सुरुवात महिलांच्या प्रेरणास्थान असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलित करण्यात आले.यावेळी महिलांनी "इतनी शक्ती हमे देना दाता " या स्फूर्ती गीताने गायन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावीक सीएमआरसी व्यवस्थापिका सौ. तनुजा पाटील-मोहिते यांनी केली.. तसेच संस्थेचे सन २०२४ - २५ या आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा कार्य अहवाल वाचन केले.सौ.सविता क्षीरसागर,सीएमआरसी लेखापाल व उपजीविका सल्लागार आकाश लोंढे यांनी केले.यावेळी प्रस्ताविकमध्ये सीएमआरसी मॅनेजर यांनी संस्था बांधणी यामध्ये स्थापन केलेली गट ग्रामपंचायत व कार्यकारणी मंडळ,समुह साधन व्यक्ती क्षेत्र समन्वयक यांची क्षमता बाधनी केली.१०० टक्के महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना विविध बँका मार्फत वित्त पुरवठा करण्यात आला.महिलांकडून कर्ज १०० टक्के परतफेड करून घेण्यात यश प्राप्त आले आहे. तसेच एकूण गटाच्या तुलनेत 91 टक्के गटांच्या अंगावर कर्ज असून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये कापड दुकान,पशुपालन, मदर पोल्ट्री युनिट,भाजीपाला, किराणा,चिकन सेंटर,स्टेशनरी, खानावळ,शिवणकाम असे व्यवसाय उभारणी करण्यात आले. नवतेजस्विनी प्रकल्प महत्त्वकांक्षी प्रकल्पातून केळी रायपनिंग व प्रोसेसिंग युनिट, दूध संकलन केंद्र, मदर पोल्ट्री व परसबागातील कुक्कुटपालन त्याचबरोबर मका प्रोसेसिंग युनिट हे मंजूर असून सदर प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात उभारण्याचे काम चालू आहे.अस अहवाल वाचनातून संस्थेच्या कामाची माहिती देण्यात आली.संस्थे अंतर्गत चालणाऱ्या आर्थिक व्यवहारचे वाचन करून दाखवण्यात आले.
सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी दिपक टेकाळे यांनी जेंडर ट्रान्स फॉर्मेटिव्ह मेकॅनिझम या प्रोजेक्ट अंतर्गत ग्रासरूट कॅम्पेनिंग फॉर एसीजी वुमन यामध्ये योजनांचा लाभ घेऊ या व प्रगतीचा वेग देऊ याबाबत प्रोजेक्टर वरती उपस्थित महिलांना विविध शासकीय योजना याबाबत माहिती दिली.डॉ.अंजली कदम यांनी आरोग्याची जनजागृती महिलांनी घ्यावयाचे आरोग्याची काळजी तसेच दवाखान्यातील शासकीय योजनांचा सुविधा याबद्दल महिलांना मार्गदर्शन करण्यात आले व बचत गटातील महिलांना तपासणी ही मोफत असेल असे सांगण्यात आले.ब्रह्मकुमारी अनिता करवा बहेनजी यांनी सुखी और स्वस्त परिवार मे महिलाओं की भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.बँक ऑफ महाराष्ट्राचे महेश गव्हाणे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र बचत गटांना सहा कोटी एवढे कर्ज देऊन.त्याची परतफेड १००% आहे. या असे सांगण्यात आले.तसेच PMJJBY व PMSBY विमा सर्व महिलांनी काढा असेल आव्हान करण्यात आले.भविष्यामध्ये जास्तीत जास्त कर्ज वाटप गटांना करण्यात येईल सांगण्यात आले... जिल्हा समन्वयक अधिकारी मन्सूर पटेल सर यांनी CMEGP, PMEGP, PMFME 35% सबसिडी याबाबत माहिती सांगण्यात आली.बचत गट व्यवस्थित चालवून गटाचे रेकॉर्ड व्यवस्थित अद्यावत ठेवण्याबाबत उपस्थित गटांना सांगण्यात आले. व कर्जाची परतफेड ही ठरलेल्या तारखेला वेळेत करण्याबाबत ही सांगण्यात आले.विक्रम साळुंखे पोलीस सहाय्यक निरीक्षक यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला एकत्र येऊन वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात व स्वतः आर्थिक सबल झाले आहेत.ही गोष्ट महिलांसाठी अभिमानास्पद आहे.
यावेळी महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.लेझीम व मंगळागौरी गाण्यावर नृत्य,टिपरी नृत्य,प्रबोधनपर भारूड,स्वच्छता व आरोग्याचे महत्त्व प्रबोधनपर गीत नृत्यातून सादरीकरण करण्यात आले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपजीविकेमध्ये सर्वात जास्त काम केलेल्या सीआरपी करिता कौतुक सोहळा व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.सन्मान हा मदरपोल्ट्री,अर्धली शेळीपालन व इतर उपजीविकेमध्ये जास्तीत जास्त महिलांना प्रोत्साहित करून शाश्वत उपजीविका उभा राहण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व उपलब्ध भांडवलाचा विनीयोग कसा करावा. याबद्दल प्रोत्साहन देणाऱ्या.
यावेळी सीआरपी यांचा कौतुक सोहळा खालील सीआरपी यांचा करण्यात आला.मोना दशरथ नवगिरे तांबवे,सोनाली नाना जाधव माळेवाडी,आसमा सिकंदर मुजावर, ईश्वर नगर,अश्विनी सचिन गिरमे, चौंडेश्वरवाडी,वैशाली सिद्धार्थ माळीनगर बळवंतकर,गौरी अजित माने देशमुख ईश्वर नगर,हिना कौसर अल्ताफ पठाण चौंडेश्वर.माळीनगर च्या अध्यक्षा श्रीमती रजनी इनामके यांनी 22 वर्ष बचत गट व्यवस्थित चालवला आणि व्यवहार पारदर्शक सांभाळले पण काही कारणास्तव परगावी वास्तव्यात जात असल्यामुळे त्यांनी बचत गटातून निवृत्ती घेतली त्याबद्दल त्यांचा निरोप समारंभ छोटसे गिफ्ट देऊन गटामार्फत व CMRC मार्फत करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी CMRC सर्व कार्यकारी मंडळ,सीआरपी, क्षेत्र समन्वयक वैशाली कांबळे,रिजवाना शेख, मनीषा गवळी,उपजीविका सल्लागार आकाश लोंढे, सीएमआरसी लेखापाल सविता क्षीरसागर,ग्रामसंघ लेखापाल महेश मदने,रुकसाना शेख यांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा