Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

गणेशवाडी कुंभारवाड्यात मूर्तिकार गणेश मूर्तीवर अखेरचा हात फिरविण्यात मग्न, शाडूच्या गणेश मूर्ती बनवण्यास शासनाच्या मान्यतेस उशीर झाला, कच्च्या मालाचे दरात वाढ झाल्याने गणेशमुर्तीच्या दरातही वाढ होणार


 

कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी 

मोबाईल नंबर 8378081147

-----गणेशोत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे गणेशवाडी (ता. इंदापूर) कुंभारवाड्यात मूर्तिकार गणेश मूर्तीवर अखेरचा हात फिरविण्यात मग्न आहेत. शाडूच्या गणेश मूर्ती बनवण्यास शासनाच्या मान्यतेस उशीर झाला असून त्यातच कच्च्या मालाचे दरात वाढ झाल्याने गणेशमुर्तीच्या दरातही वाढ होणार असल्याचे कारागीरांनी सांगितले.

    वरूणराजाने मागील साडेचार महिन्यात जोमदार हजेरी लावल्याने सर्वत्र समाधान निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम गणेशोत्सवावर होणार असल्याने गणेश मूर्तिकारांना मुर्त्या कमी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी कच्च्या मालाचे दरही मागील वर्षीच्या तुलनेत वाढले असूनही मोठ्या धाडसाने कारागिरांनी मूर्ती बनविल्या आहेत. मूर्तिकारांनी यासाठी बचतगट, पतसंस्था, बँकांकडून कर्ज घेतले आहेत. तरीसुद्धा उत्सवावर शासन निर्णयाचा परीणामाची शक्यता वाढली आहे.



      मागीलवर्षी गणेशमूर्तीच्या मागणीत अचानक वाढ झाल्याने बाजारपेठेत गणेशमुर्तीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवला होता. त्यामुळे गणेशमूर्तीना मोठ्या प्रमाणात दर वाढवून मिळाला होता. त्याच धर्तीवर यावर्षी गणेशमूर्ती चिखल माती की शाडूच्या बनवायच्या या कचाट्यात सापडल्या होत्या. शासनाने यासंदर्भातील निर्णय घेण्यास उशीर केल्याने याचा परिणाम मुर्त्या बनवण्यावर झाला असल्याचे आकाश कुंभार व जालिंदर कुंभार यांनी सांगितले.

    तर यावर्षी भांडवल मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून गणेशमूर्ती बनविण्यात आले आहेत. परंतु मागणीच्या धर्तीवर पुरवठा कमी होणार असून शेवटी ज्यादा दराने विक्री करावे लागणार असल्याचे दिपक कुंभार व सुरज कुंभार यांनी सांगितले. गणेशोत्सव जवळपास आला असून अजून मुर्त्यावर शेवटचा हात फिरवणे बाकी असल्याने ज्यादाचे कारागिर लावून काम उरकण्याची घाईगडबड सुरू असल्याचे मूर्तिकार प्रतिक्षा कुंभार व चिंतामणी कुंभार यांनी सांगितले.

     मागील वर्षी पेक्षा यावर्षी पीओपी व रंगाच्या दरात २५ टक्के वाढ झालेली असल्याचे आकाश कुंभार यांनी सांगितले. तर कच्च्या मालाच्या दर वाढीच्या पार्श्वभूमीवर मूर्तीचे दर यावर्षी वाढवावे लागणार असल्याचे प्रतिक्षा कुंभार यांनी सांगितले.



    सरकारने पीओपीच्या मूर्ती विक्रीची अट घातल्याने मूर्तीचे दर वाढणार आहेत. त्यामुळे गणेशमुर्तीची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. त्यामुळे शासनाने मूर्तिकार व सर्व सामान्यांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा. - तुकाराम घोगरे, ग्राहक

फोटो - गणेशवाडी येथील कुंभारवाड्यात गणेशमूर्तीवर अंतिम हात फिरवताना कारागीर मग्न आहेत.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा