माळशिरस तालुका प्रतिनिधी
टाइम्स 45 न्युज मराठी
चांदापुरी (ता.माळशिरस) चे दिलीप दत्तु सुळ (वय 50) यांचे काल राञी साडे आठ च्या सुमारास ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. चांदापुरीसह परीसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिलीप सुळ यांच्या छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना तातडीने अकलुज येथील दवाखान्यात नेत असताना , वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, सात भाऊ, दोन बहिणी, एक मुलगा, सात पुतण्या, बारा पुतणे, अठरा नातवंडाचा मोठा एकञित परिवार आहे. त्यांचा स्वभाव अतिशय शांत ,संयमी, व माणुसकी जपणारा होता.सर्वांशी आपुलकीने बोलणारे आणि नाते जपणारे दिलीप सुळ यांना सर्वजण प्रेमाने भाऊ म्हणुन संबोधत असत .ते चांदापुरी गावचे विद्यमान सरपंच जयवंत ( आण्णा )सुळ , यांचे बंधु होते.त्यांच्या अचानक जाण्याने गावातील लोकांचे डोळे पाणावले एक चांगले व्यक्तिमत्व हरपले . अशी भावना चांदापुरी व परिसरांतील नागरिकांनी व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा