*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- पिंपरी बुद्रुक (ता.इंदापूर) येथील भिमा नदीच्या काठावर वसलेल्या महादेव मंदिरात श्रावण महिन्या निमीत्त भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मंदिर परिसर ओम नमः शिवाय च्या जयघोषांनी दुमदुमून गेला.
श्रावण महिन्यानिमीत्त मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर भाविकांकडून फळे, फुले, श्रीफळ तसेच भिमा नदीचे पाणी वाहून मनोभावे पूजा करण्यात आली. तसेच ओम नमः शिवाय च्या जयघोष करण्यात आला. मागील पंधरा दिवसांपासून दररोज पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, गोंदी, ओझरे, टणू, गिरवी परीसरातील अबालवृद्ध, महिला भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावत आहेत.
कै. लोकनेते महादेवराव बोडके दादा यांनी भाविकांच्या मागणीचा विचार करून महादेव भक्त कै. पोपटराव सुर्यवंशी यांच्या माध्यमातून भिमा नदी काठावर शंभो महादेवाच्या पिडींची विधीवत स्थापना केली. त्यामुळे श्रावण महिन्यात भाविकांना दर्शन, पुजा करण्याची सोय करण्यात आली.
राज्याचे कृषीमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे मामांनी दिलेल्या निधीच्या माध्यमातून पाच लाखांचे मंदिराची उभारणी करण्यात आली. तसेच मंदिराकडे जाण्यासाठी आठ लाखांचा रस्ता काँक्रीटीकरण केले. मंदिर परिसरात लहान बालके व तरूणांसाठी सहा लाखांचे ओपन जिमची उभारणी करण्यात आल्याने मोठी सोय झाली आहे.
महादेव मंदिरात श्रावण महिन्या निमीत्त भजन, कीर्तन व जागरण आदि कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी गव्हाच्या खिरीचा प्रसादाचे वाटप करण्यात येते. त्याचा लाभ लहान मुले, महिला, पुरूष आदि भाविक भक्त घेतात.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील महादेव मंदिरात श्रावण महिन्या निमीत्त भाविकांची गर्दी.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा