*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील ग्रामपंचायतने तेथील औद्योगिक वसाहतींमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त नावाजलेल्या कंपन्यांनी त्यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या करासंदर्भातील बिल द्यावी व नेमलेल्या कर मोजमाप समितीने अहवाल तत्काळ बनवून प्रसिद्ध करून त्या कराची वसुली कारवाई करण्यात यावी याकरिता श्री सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक) तथा अध्यक्ष, आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तामलवाडी यांनी मागील दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पाठपुरावा करून ०४ (चार)वेळा आंदोलने केली आहेत व शेवटी २४ जुलै २०२५ रोजी आत्मदहन आंदोलन केले होते त्यावेळी नवनियुक्त गट विकास अधिकारी श्री हेमंत भिंगारदिवे यांनी लेखी पत्र देऊन अशवस्त केले होते की, सदरील औद्योगिक वसाहतीची तत्काळ मोजणी करून यथाशीग्र कर वसुली केली जाईल, त्याप्रमाणे दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी ०५ (पाच) विस्ताराधिकारी, ०५ (पाच) कनिष्ठ अभियंते व १५ (पंधरा) ग्रामपंचायत अधिकारी अशी अधिकारी व कर्मचारी यांची समितीची नेमणूक केलेली असून, जी समिती दिनांक २० ऑगस्ट २०२५ ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत बालाजी अमाईन्स लिमिटेड कंपनी तामलवाडी येथील कंपनीच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करण्याचे आदेश पारित केलेले असून त्यानुसार एका माजी सैनिकास भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला कर वसुली करण्याबाबत एक सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासनाने आंदोलक श्री शिवाजी सावंत यांना कळवले आहे,
याबाबत श्री सावंत यांनी समाधान व्यक्त केले व प्रशासनाचे व ज्या पत्रकार बांधवांनी त्यांची आवाज प्रशासनास पोहचवण्यासाठी सहकार्य केले त्यांचे आभार मानले आहेत व वसुलीची कारवाई तत्काळ करा अशी प्रशासनास विनंती केली आहे त्यामुळे तामलवाडी परिसरात सर्व ग्रामस्थांकडून भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येस माजी सैनिक श्री सावंत यांनी लोकशाही पद्धतीने केलेल्या आंदोलनाचे कौतुक करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा