Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

अकलूज (रत्नाई पार्क) येथे ईद मिलादुन्नबी पैगंबर जयंतीनिमित्त १० दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


 

मुख्यसंपादक--हुसेन मुलाणी

 टाइम्स 45 न्युज मराठी

सालाबाद प्रमाणे अकलूज येथील महाळुंग रोड वरील" रत्नाई पार्क"  येथे इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (सल्लाल्लाहू अलै वसल्लम) यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती' रत्नाई पार्क तांबोळी आत्तार गृह संकुला च्या वतीने घेण्यात आली आहे.

या वर्षी   मिलाद-उन-नबी (हुजुर-पुरनूर) सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची १५०० वी जयंती साजरी करत आहोत. या निमित्ताने या आनंददायी प्रसंगाचे आयोजन करण्यासाठी, मक्का मस्जिद रत्नाई पार्क तांबोली अत्तर गृह संकुल येथे२६ ऑगस्ट २०२५ ते ३ सप्टेंबर २०२५ या १० दिवसांचा मिलाद मेहफिल आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये ७ दिवस नात मेहफिल आणि ३ दिवस सिरत-ए-मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर प्रवचन होईल. अलहमदुलिल्लाह ! या मेहफिलमध्ये दूरदूरवरून प्रसिद्ध नात पठण करणारे नात पठण करण्यासाठी येत आहेत

या कार्यक्रमाची रूपरेषा पुढी प्रमाणे:- १)सोमवार

दिनांक २५ ऑगस्ट २०२५  ( १रब्बील अव्वल ) रोजी रात्री ९ते १०/१५ या वेळेत नाते पाक सादरकर्ते प्रमुख पाहुणे मद्दाहे रसुल हाफीज मोहम्मद अहमद रजा ( मिरज) 

         २) मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ते १०/१५ नाते पाक, सादरकर्ते हाफीज मोहम्मद अहमद रजा ( मिरज)

.       ३) बुधवार दिनांक २७  ऑगस्ट २०२५ रोजी रात्री  ९ ते १०/१५( दफ के साथ )नातेपाक -सादरकर्ते, मद्दाहे रसूल- हजरत हाफिज व कारी सय्यद फुरकान अली नक्शबंदी ,(हैदराबाद)

          ४) गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ ते १०/१५(दफ के साथ) नातेपाक-सादरकर्ते, मद्दाहे  रसूल-हजरत हाफिज व कारी सय्यद फुरकान अली नक्शबंदी ( हैदराबाद). 

     ५) शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ ते १०/१५ वाजेपर्यंत नातिया महेफिल, सादरकर्ते जनाब तनवीर,-ज, अशरफ,ज-इरफान,ज-जुनेद,ज-शारीब,ज-कामील हुसैन,ज-सद्दांम,ज-बरकरत,ज-रेहान,ज- मोहम्मद आयाज,ज-मोहम्मद दानियाल,ज-मोहम्मद मुज्जमील,

    ६) शनिवार दिनांक३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ते १०/१५ पर्यंत, नातेपाक -सादरकर्ते --मद्दाहे रसूल मौलाना हाफीज मोहम्मद अल्ताफ 

रजा -गोंन्डवी

   ७) रविवार दिनांक ३१ ऑगस्ट३०२५ रोजी रात्री ९ ते१०/१५ वाजेपर्यंत-नातेपाक,-सादरकर्ते-मद्दाहे रसुल, मौलाना हाफिज मोहम्मद अल्ताफ रजा गोंन्डवी

    ८) सोमवार दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री  ९ ते  १०/१५ वाजेपर्यंत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या  ( जीवनावर विषय- जन्मापासून ते भविष्यवाणी च्या घोषणेपर्यंत)प्रवचन 

   ९) मंगळवार दिनांक  २ सप्टेंबर  २०२५ रोजी रात्री ९ ते रात्री १०/१५ वाजेपर्यंत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या (जीवनावर,  विषय -पैगंबरत्वाच्या  घोषणेपासून हिजरत पर्यंतचा प्रवास)

    १०) बुधवार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी, रात्री  ९ ते १०/१५ पर्यंत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या (जीवनावर-,:- विषय हिजरत पासून ते शेवट देवाज्ञा देहांत (विसाल) पर्यंतचा प्रवास) या विषयावर प्रवचन होणार आहे तरी अकलूज आणि परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांनी दहा दिवस दररोज  रात्री  ९ ते१०/१५ या वेळेत होणाऱ्या  विविध धार्मिक कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे



 *"रत्नाई पार्क"- तांबोळी अत्तार गृह संकुल  अकलूज*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा