अकलूज--- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
धनशैल्य शिक्षण संस्था अकलूजचे संस्थापक व अध्यक्ष डॉ.मनिष धनंजय गायकवाड यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मेरीलँड स्टेट युनिव्हर्सिटी,यूएसए तर्फे डॉक्टरेट ऑफ फिलासाॅफी इन एज्युकेशन ही मानद पदवी बहाल करण्यात आली आहे.
ही मानद पदवी दिल्ली येथे झालेल्या क्लस्टर ऑफ अचीवर्स या कार्यक्रमात युनिव्हर्सिटीचे सिनेट मेंबर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.यावेळी डॉ.संजय अग्रवाल (माजी सचिव,होम अफेअर्स,भारत सरकार),डॉ.अभिषेक पांडे (माजी सचिव,दिल्ली युनिव्हर्सिटी) तसेच बॉलिवूड सुपरस्टार परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या प्रसंगी बोलताना डॉ.मनिष गायकवाड म्हणाले की, आज माझं नव्हे तर माझ्या वडिलांचेही स्वप्न साकार झालं आहे. त्यांनी ही मानद पदवी आपल्या आई श्रीमती शैलजा धनंजय गायकवाड यांच्या आशीर्वादाने आपल्या वडिलांना कै.धनंजय पंडितराव गायकवाड यांना समर्पित केल्याचे सांगितले.युनिव्हर्सिटी मार्फत झालेली प्रबंध सादरीकरण,पेपर सबमिशन व ओरल परीक्षा,तसेच आपल्या पत्नी,भाऊ,शुभचिंतक आणि मित्रपरिवार यांनी दाखवलेल्या विश्वास व साथ यामुळेच हे यश शक्य झाल्याचे असे त्यांनी सांगितले.या पदापर्यंत पोहोचण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा ते मनःपूर्वक ऋणी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा