कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
----- परंपरागत शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कमी मजूरात, कमी खर्चात, योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने खतांची मात्रा वापरून उत्तम शेती कशी करायची यासाठी पिंपरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी दोन दिवसीय शेतकरी अभ्यास दौरा काढला होता.
पिंपरी बुद्रुक येथील साई ॲग्रोच्या वतीने पंचक्रोशीतील गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, टणू, गिरवी, ओझरे गावातील तीस प्रगतशील बागायतदारांचा द्राक्ष, डाळींब शेतीच्या नवीन तंत्रज्ञान, रोपवाटीकेची पाहणी व माहिती करून घेण्यासाठी सटाणा, पिंपळगाव बसवंत, वनी गावांचा अभ्यास दौरा काढण्यात आला होता.
शेतकऱ्यांनी प्रथम सटाणा येथील मातोश्री नर्सरीला भेट देवून निरोगी व सशक्त रोपे व त्याची असणारी वैशिष्ठ्ये त्यामध्ये डाळींबाची जाड साल, रोगप्रतिकारशक्तीस उत्कृष्ठ वान, मर रोगास सहनशील, रोप बनवण्याची पद्धत याबद्दल माहिती घेतली.
प्रगतशील व आधुनिक शेतकरी नितीन ठाकरे यांच्या शेतील भेट देवून नवीन लागवड पद्धत व तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती घेतली. तसेच नितीन ठाकरे यांचे एक खोड तंत्रज्ञान व पिकास येणाऱ्या अडचणीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तर क्रेटेली फ्रुट येथील विश्वजीत मोरे यांच्या डाळींब शेती, अव्हॅकडो द्राक्ष शेतीला भेट देवून माहीती घेतली.
पिंपळगाव बसवंत येथील मान्सून फुड क्रॉप सायन्स कंपनीय भेट देवुन घरकीन काकडी इंम्पोर्ट तसेच द्राक्ष एस्पोर्ट विषयी माहीती घेतली. स्पेन वरुन इंम्पोर्ट व नविन तंत्रज्ञानयुक्त औषधांविषयी माहीती घेतली.
सदर अभ्यास दौऱ्यामध्ये पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील ओझरे, गिरवी, गणेशवाडी, टणु या गावातील तीस प्रगतशील शेतकयांनी सहभाग नोंदवला. शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन पिंपरी बुद्रुक येथील साई अँग्रोच्या वतीने करण्यात आले होते. यातुन शेतकयांनी नविन तंत्रज्ञान व लागवड पद्धत अवलंब कशी करावी याचे तुषार बोडके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
फोटो - पिंपळगाव बसवंत येथील मान्सून फुड क्रॉप सायन्स कंपनीय भेटी प्रसंगी शेतकरी अभ्यास गट दिसत आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा