Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

चंद्रपूरचे कवी एम ए रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार 2025


 

उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

 दिनांक २८/९/२०२५ रोजी जळगाव येथील अल्पबचत भवन कलेक्टर ऑफिस येथे सकाळी 11 वाजता राज नंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव आयोजित राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार श्री एम ए रहीम बंदी चंद्रपूर यांना मिळाला. 

राजनंदनी बहुउद्देशीय संस्था जळगाव ही सामाजिक ,सांस्कृतिक, साहित्य, प्रशासक आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर करीत असते यात श्री एम ए रहीम बंदी चंद्रपूर यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५ त्यांचे साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय उपक्रमशील कार्याची दखल घेऊन देण्यात आला आहे.

यापूर्वी बरेच पुरस्कार बंदी यांना मिळालेले आहे. संपादक श्री प्रमोद सूर्यवंशी यांचे साप्ताहिक आम्ही मुंबईकर आयोजित कार्यक्रमात दिनांक 27 जुलै 2025 ला जोगेश्वरी पूर्व मुंबई येथे सांस्कृतिक व साहित्यरत्न पुरस्कार 2025 हा नुकताच मिळालेला आहे. 

राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संस्थापक अध्यक्षा सौ.संदिपा वाघ व त्यांचे यजमान श्री ज्ञानेश्वर वाघ यांनी पुरस्कार देऊन गौरव केलेले आहे व उपस्थित मंडळी तसेच चाहत्यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा