सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहिशाल केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सन २०२३ चा बाबुराव बागुल कथा पुरस्कार, रुख्मिणी पुरस्कार, शिक्षणमहर्षि डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति पुरस्कार आणि ज्ञानदिप पुरस्कार वितरण सोहळा मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीच्या सभागृहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री चैत्राम पवार हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे मंचावर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे, व्यवस्थापन मंडळ सदस्या तथा संचालक प्रा. संजिवनी महाले व विद्यार्थी कल्याण व बहिशाल केंद्रांचे प्रमुख डॉ. दयाराम पवार हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि शिक्षणमहर्षि डॉ. पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, बाबुराव बागुल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दयाराम पवार यांनी केले.
याप्रसंगी पुढीलप्रमाणे पुरस्कार प्रदान करण्यात आले. बाबुराव बागुल कथा पुरस्कार - दरवर्षी जेष्ठ साहित्यीक बाबुराव बागुल यांच्या नावाने नवोदित कथा लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या प्रथम कथासंग्रहाला बाबुराव बागुल कथा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप रु. एकवीस हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. सन २०२३ चा पुरस्कार नव्या पिढीतील प्रतिभावान लेखक विवेक वसंत कडू यांच्या ‘चार चपटे मासे’ या कथासंग्रहास प्रदान करण्यात आला.
दरवर्षी "रुख्मिणी पुरस्कार कृषी व ग्रामीण विकास, पर्यावरण, समाजसेवा, महिला व बालकल्याण, पत्रकरिता, प्रशासन, कला, व क्रीडा आणि आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० वर्ष वयापर्यंतच्या महिलेला दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप रु. एकवीस हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. सन २०२३ चा पुरस्कार एक प्रेरणादायी नेतृत्व आणि सामाजिक बदलाच्या प्रणेत्या, भटक्या विमुक्त समाजासाठी बहुमोल कार्य करणाऱ्या दीपा अरूणा अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला.
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार" दरवर्षी पारंपरिक शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा शैक्षणिक संस्थेस आळीपाळीने देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप रु. एकवीस हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. सन २०२३ चा पुरस्कार अध्ययनार्थी बरोबरच महिला, शेतकरी, अंगणवाडी सेविका, ग्रामरोजगार सेवक इत्यादींच्या दैनंदिन जीवनात शास्त्रीय ज्ञानाचा आधार, आस्था आणि आपलेपणाची भावना प्राप्त करून देणाऱ्या डॉ. तक्षशिला मोटघरे यांना प्रदान करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत श्री चंद्रकांत कुशारे यांच्या कडून त्यांच्या पत्नी इंदुमती चंद्रकांत कुशारे यांचे स्मरणार्थ प्रतिवर्षी दूरशिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा शैक्षणिक संस्थेला 'ज्ञानदीप पुरस्कार" दिला जात असून या पुरस्काराचे स्वरूप रु. एकवीस हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. सन २०२३ चा पुरस्कार दूरशिक्षण आणि मुक्त शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत कर्तव्यनिष्ठ प्रयोगशिल आणि व्यापक दृष्टिकोन असलेले विचारवंत डॉ. संजय भीमाशंकर रत्नपारखी यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी सर्व सत्कारमूर्ती पुरस्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी पद्मश्री चैत्राम पवार म्हणाले, मला देखील यापुर्वी मुक्त विद्यापीठाने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे मुक्त विद्यापीठ हे सदैव आपल्या सर्व पुरस्कारार्थींच्या कामासोबत आहे. आपण हा पुरस्कार घेऊन थांबणार नाही, तर समाजाला वेगळे नेतृत्व निर्माण करणे आणि विकासाच्या दृष्टीने देशाला सातत्याने पुढे नेण्यासाठी प्रयत्नशिल राहू. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले, मुक्त विद्यापीठ हे लोकविद्यापीठ असून त्यामुळे समाजात चांगले काम करणाऱ्यांचा गौरव करणे हा या पुरस्कारा मागचा उद्देश आहे. याप्रसंगी त्यांनी निवड समितीच्या सदस्यांचे कौतुक केले. तसेच पुरस्कारार्थी करत असलेल्या कामाबाबात त्यांना विद्यापीठाची जी काही मदत लागेल, त्यासाठी विद्यापीठ सदैव त्यांच्या सोबत राहिल अशी ग्वाही दिली.
पुरस्कार मानपत्राचे वाचन डॉ. माधुरी खर्जुल, किशोर शिंदे यांनी केले. पुरस्कार निवड समिती सदस्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी पुरस्कार निवड प्रक्रियेबाबत उपस्थितांना माहिती दिली. सूत्रसंचलन डॉ. पूनम वाघ यांनी केले. कार्यक्रमास विद्यापिठाच्या विविध विद्याशाखेचे संचालक, प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, पुरस्कारार्थींचे नातेवाईक उपस्थित होते.
फोटो ओळी – मुक्त विद्यापीठात आयोजीत विविध पुरस्कार वितरणप्रसंगी पुरस्कारार्थीं (मागे डाव्याबाजूस अनुक्रमे- श्री. विवेक वसंत कडू, दीपा अरूणा अशोक पवार, डॉ. तक्षशिला मोटघरे, डॉ. संजय भीमाशंकर रत्नपारखी) समेवत कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, प्रभारी कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे, प्रा, संजीवनी महाले. डॉ. दयाराम पवार




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा