संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अन्वा गावात महादेव मंदिरात गोमांस लटकवल्याचा धक्कादायक प्रकार मागील आठवड्यात दोन वेळेस घडला होता. या प्रकरणी, नंदकिशोर सुरेश वडगावकर (वय ३२, रा. अन्वा, ता. भोकरदन, जि. जालना) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
कृष्णा रामा सोनवणे (वय ५२, रा. उंडणगाव, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पारध पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल केली
होती. अन्वा येथील हेमाडपंती महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराला एका अज्ञात व्यक्तीने गोमांसाचा तुकडा लटकवून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते.
या तक्रारीनंतर पारध पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी नंदकिशोर वडगावकर याने आपला गुन्हा कबूल केला असल्याची माहिती पारध पोलिस ठाण्याचे एपीआय संतोष माने यांनी दिली आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
*साभार:--दैनिक पोलिस न्युज --जालना*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा