Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

ए डी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने दिला जाणारा 'पद्मश्री सिंधुताई सपकाळ समाज रत्न पुरस्कार २०२५" कल्पनाताई जाधव (काटकर) यांना जाहीर


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

सनमडी ता.जत जि.सांगली येथील येडे फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणारा" *पद्मश्री सिंधुताई सपकाळ महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार २०२५*" हा पुरस्कार बारामती येथील आदर्श महिला कल्पनाताई जाधव (काटकर )यांना जाहीर झाले असल्याचे ए डी(अनुश्री धनश्री) फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक' अशोक श्रीपती गोरड' यांनी पत्राद्वारे कळवले आहे


 सत्कारमूर्ती आपणास कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार सोहळा २०२५ आम्ही साजरा करत आहोत, या सन्मान सोहळ्यासाठी आपली निवड करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी मा. मंत्री, लोकप्रतिनिधी, कलावंत, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते इ. उपस्थित राहणार आहेत. सन्माननिय अतिथींच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. विशेष उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून आपली राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार २०२५ साठी निवड करतांना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे जे पवित्र विधायक कार्य आपण हाती घेतले आहे ते तुमच्या हातून निरंतर घडत राहो



आपण करत असलेल्या उल्लेखनीय, प्रभावी कार्यातून एक सक्षम राष्ट्राच्या प्रस्थापनेचा प्रवाह भक्कम होऊन सखोल मानवीय अंतर्मनाचा चेहरा प्रफुल्लित सन्मुख होतो. तुम्ही कार्यरत असलेल्या क्षेत्रात तुम्ही तुमच्या कार्याचा ठसा उमटवला आहेच शिवाय, आपल्या हातून होत असलेली राष्ट्रसेवा ही खरोखरंच अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे कष्टाची जाणीव व सत्याची कास धरुन चालतांना आपल्याकडं पाहिलं की आपण कार्यरत असलेल्या क्षेत्रामध्ये नव्याने येऊ पाहणाऱ्या युवकांना नक्कीच प्रेरणा मिळते. एक अष्टपैलू व्यक्तीमत्वं कसं असावं याचं उत्तम उदाहरण आपल्याकडं पाहिलं की लक्षात येतं. आपण सदैव आनंदी रहावे व इतरांना आनंदी करावे ही मनस्वी इच्छा!


आपल्या पुढील विश्वकार्याच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा ! !


अध्यक्ष


अनुश्री धनश्री फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा