संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
सोलापूर : देशात सध्या सत्तेवर असलेल्या भाजपा प्रणीत मोदी सरकारने जनतेला खोट्या आश्वासनांची खैरात वाटली असून, महत्त्वाच्या जीवनावश्यक प्रश्नांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. जाहिरातबाज व घोटाळेबाज धोरणांनी जनतेला हवालदिल करून टाकले आहे. या सरकारला धुळीस मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवरूनच लढा सुरू करावा लागणार असल्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे.
याच पार्श्वभूमीवर आगामी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकजुटीने लढण्याचा वज्रनिर्धार व्यक्त करण्यात आला. याबाबतची माहिती ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी दिली.
आज सोलापूर येथील लोटस हॉटेलमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीच्या प्रारंभी अलीकडेच निधन झालेल्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर निवडणूक तयारीवर सविस्तर चर्चा झाली. महाविकास आघाडीने “लुटो, बाटो आणि खाओ” या धोरणावर चालणाऱ्या भाजपला सोलापूरच्या जनतेसमोर उघडे पाडून आगामी निवडणुकीत भुईसपाट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीस काँग्रेस शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रवक्ते अशोक निंबर्गी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुधीर खरटमल, माजी महापौर नलिनीताई चंदेले, माजी अध्यक्ष भारत जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी, जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, नाना मोरे, भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी चे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर मा. नगरसेविका नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, ॲड.अनिल वासम, साथी दत्ता चव्हाण, तिरुपती परकीपंडला, चंद्रकांत पवार, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा