इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी हा पक्षाचा मजबूत पाया असून कृषी विभागाच्या सर्व योजनांची पुस्तिका त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल अशी ग्वाही राज्याचे लोकप्रिय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शना खाली तसेच अध्यक्षते खाली राष्ट्रवादी चिंतन शिबिर संपन्न झाले. या शिबिरात शेती तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाने सुरु केलेल्या योजना, त्या कशा राबविल्या जातात? या विषयांवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.
यावेळी पक्ष अधिक बळकट करण्यासाठी आणि भविष्यातील मार्ग निश्चित करण्यासाठी काही विशेष चिंतन गटांची रचना करण्यात आली होती. 'पन्हाळा' या गटाचा अध्यक्ष म्हणून मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गटातील सभासदांना मार्गदर्शन करत 'कृषी व शेतकऱ्यांचे हक्क' या विषयावर सर्वसमावेशक शेतकरी हिताची आणि बांधीलकीची चर्चा घडवून आणली. या चर्चेतून पाच ठोस, कृती योग्य मुद्दे सर्वानुमते ठरवून ते शिबिरात उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांपुढे मांडले. ग्रामीण भाग व या भागातील शेतकरी हा पक्षाचा पाया आहे, त्यामुळे पक्षाच्या पदाधिका-यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ शेतक-यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केलं. कृषी विभागाच्या योजनांची पुस्तिका सर्वांपर्यंत पोहचविण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी चिंतन शिबिरा मार्फत शिव, शाहू, फुले,आंबेडकर यांच्या पुरोगामी राष्ट्रवादी विचारांना अग्रस्थानी मानत, दिवसभर विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर, पक्षाच्या आगामी ध्येयधोरणा बाबत तसेच पक्षाची राज्यासह देशाच्या विकासाबाबतची भविष्यकालीन शाश्वत भूमिका यासंदर्भात विचारमंथन करण्यात आले.
यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी संपूर्ण राष्ट्रवादी परिवाराला विविध विषयांवर संबोधित केले. यावेळी उपस्थित इतर सदस्यांनीही चर्चेत सहभाग घेतला. यावेळी शिबिराच्या संपन्नतेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या माध्यमातून बहुचर्चित 'नागपूर डिक्लरेशन' हा आराखडा तयार करून तो सादर करण्यात आला.
या चिंतन शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय नेते व खासदार श्री. प्रफुल्ल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री. सुनिलजी तटकरे साहेब, ज्येष्ठ नेते श्री. छगन भुजबळ साहेब, मा. मंत्री श्री. दिलीपराव वळसे पाटील साहेब, खासदार सौ. सुनेत्रावहिनी पवार, पक्षाचे मंत्रीमंडळातील सहकारी, आमदार, पक्षाचे मान्यवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा