इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
राज्यात आरोग्य संवर्धनाचा इंदापूर तालुक्याचा आदर्श बिजवडी पॅटर्न निर्माण करणारे आरोग्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवारी ७ सप्टेंबर रोजी सत्कार. होणार आहे
सलग ३ वर्षे जिल्हा स्तरीय कायाकल्प पुरस्कार प्राप्त, डास निर्मूलनाच्या "बिजवडी पॅटर्न" चे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांचे समोर मंत्रालयात सादरीकरण झालेल्या तसेच मुख्यमंत्री १०० दिवस कार्यक्रम यशस्वी पणे राबविल्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पत्राद्वारे अभिनंदन केलेल्या मदर प्राथमिक आरोग्य केंद्र - बिजवडी अंतर्गत अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या २०० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या यशोगाथेचा उद्या रविवार, दिनांक ०७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते २.०० दरम्यान राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय ( मामा ) भरणे यांच्या हस्ते तसेच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान होणार आहे. यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीणभैय्या माने, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, गटविकास अधिकारी डॉ. सचिन खुडे, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बिजवडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा म्हणाले, आमच्या आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी नियोजनबध्द काम केल्यामुळे राज्यासह जिल्ह्यात विविध विक्रम झाले आहेत. साथीचे रोग खूप कमी झाले आहेत. माझे सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ मिळाल्याने आम्ही हे विक्रमी काम करू शकलो. त्यास मंत्री दत्तात्रय भरणे मामा तसेच उपरोक्त मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा