संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
नऊदारे (लासुर्णे) येथे शनिवार दि.६ सप्टेंबर २०२५ रोजी स्मृतीशेष शालीनी रामचंद्र वनसाळे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांनी शालीनी वनसाळे यांच्या स्मृतींना अभिवादन करताना आईवडीलांकडून मिळालेले संस्कार व शिकवणी याच्या वाटेवर प्रत्येकाने मार्गक्रमण करा, व आपल्या आईवडीलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्मृती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे असे मत मांडले. यावेळी जेष्ठ पॅंथर सु.ग. साबळे, रिपब्लिकन नेते शिवाजीराव मखरे, लासुर्णे गावचे सरपंच सागर पाटील यांनी शालीनी वनसाळे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाला वालचंदनगर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर, कळंब चे सरपंच विद्याताई सावंत, भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रदेश अध्यक्ष तानाजी धोत्रे, इंदापूर चे नगरसेवक अशोक मखरे सर, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, पोलीस कॉन्स्टेबल जगदीश चौधर, पोलीस कॉन्स्टेबल श्री चांदणे, कळंब कॉलेज चे माजी उपप्राचार्य डॉ.अरुण कांबळे सर, आंबेडकरी चळवळीचे विशाल साळवे, सणसरचे पोलीस पाटील राजेंद्र चव्हाण, तावशी चे पोलीस पाटील सागर खरात, लासुर्णे चे ग्रामपंचायत सदस्य संतोष पिपा लोंढे, लासुर्णेचे ग्रामपंचायत सदस्य दिपक लोंढे, वालचंदनगर चे ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन गायकवाड, लासुर्णे चे माजी ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन लोंढे व वैभव लोंढे , सामाजिक कार्यकर्ते मनोज कुलकर्णी, जंक्शन चे उद्योगपती बाळासाहेब गोरे, अक्षय राजकुमार भोसले, अंथुर्णे चे माजी उपसरपंच संजय वनसाळे, गायक विजयदादा सरतापे, गायक राहुल क्षीरसागर , बौद्ध धम्माचे प्रचारक श्यामराव भोसले त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर , स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा