प्रतिनिधी - शकूर तांबोळी, अकलूज.
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात हिंदी दिवस व अभियंता दिन उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अमोल फुले सर यांच्या हस्ते प्रतिमा व हिंदी उपन्यास पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य श्री. सुभाष मुंडफणे, संजय जाधव, शिक्षक प्रतिनिधी संजय राऊत व कल्पना मोरे उपस्थित होते.
*✨ हिंदी दिवस : राष्ट्रभाषेचा गौरव*
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना बलभीम काकुळे यांनी विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्व पटवून दिले. विद्यालयातील सहशिक्षक शैलेश माने यांनी अभ्यासपूर्ण प्रभावी भाषणात हिंदी दिवस साजरा करण्याचा उद्देश सांगून त्याचे महत्व अधोरेखित केले. तसेच “हिंदी ही केवळ राष्ट्रभाषा नसून स्वातंत्र्यलढ्याच्या काळात जनतेला एकत्र आणणारे प्रभावी साधन होते.आजच्या काळात देखील हिंदी भाषेचे सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय स्तरावरील महत्व शालेय जीवनात समजण्याची आवश्यकता तसेच "भविष्यातील हिंदी आणि हिंदीचे भविष्य" या अनुषंगाने विचार व्यक्त केले
*✨ अभियंता दिन : विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रेरणा*
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी अभियंता दिनाचे महत्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, “भारताचे प्रख्यात अभियंता व भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे जीवन हे विज्ञान-तंत्रज्ञान व प्रगतीचे प्रेरणास्थान आहे. अभियंता दिन साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पना व तांत्रिक कौशल्य आत्मसात करून देशाच्या विकासात योगदान द्यावे.”
त्याचबरोबर हिंदी दिनाबाबत ते म्हणाले, “हिंदी ही देशाच्या एकतेची व संप्रेषणाची प्रभावी भाषा आहे. मातृभाषेसह हिंदीचा प्रसार व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.”
*✨ विशेष सन्मान व कार्यक्रमाची सांगता*
याप्रसंगी विद्यालयातील हिंदी शिक्षकांचा विशेष सन्मान करून त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली. विद्यालयात संपूर्ण दिवस हिंदी भाषेचा वापर करण्यात आला. या कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेत्तर व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा