इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
इंदापूर तालुका हा नीरा भीमा नद्यांच्या खोऱ्यात वसला असून उजनी धरणाचे विस्तीर्ण पाणलोट क्षेत्र देखील तालुक्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा केळी पिकाकडे कल वाढला आहे. त्यामुळे शेतकरी सुखी तर जग सुखी या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीमालास आर्थिक न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा बाजार समितीचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीची सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची तेरावी वार्षीक सर्वसाधारण सभा आज रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता समितीचे मुख्य बाजार आवार इंदापूर डाळींब मार्केट यार्ड येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार देवराज जाधव होते. यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच इंदापूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची ६५ वी वार्षीक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, देशाबरोबरच तालुक्याची देखील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने शेतकरी सक्षमीकरण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव म्हणाले, इंदापूर बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था असल्याने समितीत येणारा प्रत्येक शेतकरी व संबंधित घटकांना न्याय देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. समिती लवकरच इंदापूर येथे केळी मार्केट पुर्ववत करणार आहे तसेच भुसार, मासे(मासळी), फुले, डाळींब, पेरु, कांदा, ड्रॅगन फ्रुट व सिताफळ या कार्यरत असलेला बाजार आणखी वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. मुख्य बाजार इंदापूर येथे शेतकरी निवास, उपबाजार भिगवण येथे अधुनिक शॉपींग मॉल, मुख्य बाजार इंदापूर शहर व उपबाजार निमगांव-केतकी येथे नविन पेट्रोल पंप व इतर शेतकरी घटकांकरीता शेतमाल खरेदी-विक्री अनुशंगिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण असल्याची माहिती बाजार समितीचे मार्गदर्शक तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व
इंदापूर बाजार समितीचे सभापती तुषार जाधव यांनी संयुक्तपणे दिली.
यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मनोहर ढुके, संचालक तथा माजी आमदार यशवंत ( तात्या ) माने, माजी सभापती विलासराव माने व दत्तात्रय फडतरे, संचालक मधुकर भरणे, रोहित मोहोळकर, संग्रामसिंह निंबाळकर, संदिप पाटील, सौ. रुपालीताई संतोष वाबळे, सौ. मंगलताई गणेशकुमार झगडे, आबा देवकाते, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे, खरेदी-विक्रीचे अध्यक्ष प्रताप पालवे, उपाध्यक्ष विजय घोगरे, हरिभाऊ जाधव, बाळासो जगताप, प्रतिक घोगरे, मकरंद जगताप, अमोल भोईटे, रामचंद्र रूपनवर, सचिन जाधव, जाऊद्दीन शेख, कैलास येरळकर, रविंद्र सरडे, जयंत जाधव, विष्णू देवकाते, सौ. फातिमा पठाण, प्रतिभा पवार, चंद्रकांत बोराटे, राहुल मिसाळ, देवराज जाधव, अंकुश जाधव, गजानन जगताप, अभिजीत माने, श्री. पांढरे, दशरथ यादव, कांतीलाल झगडे, दत्तात्रय सवासे, दत्तात्रय सपकळ, नंदकुमार रणवरे, चित्तरंजन पाटील, अजिनाथ बोराडे, उत्तरेश्वर गोलांडे, दिनकर नलवडे, माजी सचिव डी. डी. देवकर, महावीर गांधी, बळीराम बोंगाणे, बापुराव यादव, तात्यासो वडापुरे, पिडीसिसी बँकेचे सेवा निवृत्त अधिकारी हनुमंत शिंदे, प्रभारी सचिव संतोष देवकर, खरेदी विक्री संघाचे प्रभारी मॅनेजर नवनाथ शिंदे उपस्थित होते. संचालक संग्रामसिंह निंबाळकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
फोटो ओळ: इंदापूर : बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे. सोबत बाजार समितीचे अध्यक्ष तुषार जाधव व मान्यवर.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा