Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर ---शिवसेना ॲक्शन मोडवर-- तुळजापूर तालुक्यात एकाच दिवशी चार गावांमध्ये शाखांचे उद्घाटन...


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

तुळजापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच शिवसेना पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तालुक्यातील गावागावात शाखा विस्तार सुरू करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून तुळजापूर तालुक्यातील दीपकनगर तांडा, कुणसावळी,बोळेगाव व यमगरवाडी येथे एकाच दिवशी चार गावांमध्ये भव्य दिव्य पद्धतीने शाखा उद्घाटन सोहळे पार पडले.


हा उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार,पक्षाचे सचिव संजय मोरे,उपनेते ज्ञानराज चौगुले,जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.या वेळी धाराशिव जिल्हाप्रमुख मोहन पनुरे,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश जगताप,तसेच तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखांचे उद्घाटन करण्यात आले.



या उद्घाटन सोहळ्यात संबंधित गावांतील शाखाध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव,कोषाध्यक्ष,सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.गावातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.


आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रत्येक गावात संघटना विस्तार करण्याचा शिवसेनेचा निर्धार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.या माध्यमातून पक्षाची संघटना आणखी सक्षम व परिणामकारक होईल,असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


या सोहळ्यात तुळजापूर शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख गणेश नेपते,तुळजापूर शहर प्रमुख बापूसाहेब भोसले,उपाध्यक्ष रमेश चिवचिवे,भुजंग मुकेरकर,संभाजी नेपते,शहाजी हाके,स्वप्निल सुरवसे,संजय लोंढे,नितीन मस्के,रितेश जवळेकर,गणेश पाटील,विकास जाधव यांसह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


एकूणच,जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणामुळे निर्माण झालेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने तालुक्यातील संघटन मजबूत करण्यासाठी हाती घेतलेला हा उपक्रम पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये मोठी ताकद मिळवून देणार असल्याचे चित्र उभे राहिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा