संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांना
साखर उद्योगाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोशिएशन इंडिया पुणे यांच्या वतीने साखर उद्योगातील "सर्वोत्तम कामगिरी" हा पुरस्कार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पुणे येथील भव्य समारंभात देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर सहकार आयुक्त दीपक तावरे यशदाचे महासंचालक शेखर गायकवाड, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, डेक्कन शुगरचे अध्यक्ष सोहम शिरगावकर, साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ, डेक्कन शुगरचे माजी अध्यक्ष एस. डी. भड तसेच एन. चिन्नप्पन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डेक्कन शुगर च्या वतीने देशातील साखर उद्योगात उल्लेखनीय कार्य करणारे साखर कारखाने व
प्रशासकीय अधिकारी यांना साखर उद्योग गौरव, सर्वोत्कृष्ट साखर कारखाना, तांत्रिक कार्यक्षमता, इंडस्ट्रियल एक्सेलेन्स, सर्वोत्तम कामगिरी, जीवन गौरव आदी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कारखान्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्हा. चेअरमन कैलास खुळे, संचालक दिनकरराव मोरे, बाळासाहेब यलमार, तानाजी वाघमोडे, भगवान चौगुले, केन मॅनेजर संतोष कुमठेकर, प्रोडक्शन मॅनेजर एम.आर. कुलकर्णी, डॉ. सुधीर पोफळे, सचिन विभुते, हणमंत नागणे, आर.एस. पाटील, तानाजी भोसले, सोमनाथ भालेकर, समीर सय्यद, सुभाष मिसाळ व युनियन सदस्य विजय पाटील उपस्थित होते. या पुरस्कारामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह पांडुरंग साखर कारखान्याचा सन्मान वाढला असून, सर्व स्तरांतून डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. यशवंत कुलकर्णी यांना पुरस्कार प्राप्त झालेबद्दल चेअरमन प्रशांत परिचारक, माजी आमदार मानसिंग नाईक, आ. विनय कोरे, युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांनी अभिनंदन केले.
डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी पांडुरंग साखर कारखान्याच्या कार्यक्षमता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, को जनरेशन व आसवनी प्रकल्पाचे यशस्वी विस्तारीकरण, उत्पादन वाढ, ऊस विकास आणि पर्यावरणपूरक धोरणे या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने उद्योगक्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत, त्यांच्या कार्याची दखल घेऊन डेक्कन शुगर ने "सर्वोत्तम कामगिरी" हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा