कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
----- सराटी ग्रामपंचायतचे सदस्य पैलवान सुधीर (भैय्यासाहेब) कोकाटे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. भैय्यासाहेब कोकाटे पाटील युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाढदिवसाचे औचित्य साधून १००० वह्यांचे वाटप पंचक्रोशीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आले. युवा प्रतिष्ठानच्या वतीने केक, हार, फटाक्यांचा अपवव्य खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवला. त्याबद्दल जनतेमधून कौतुकाची थाप भैय्यासाहेब यांना देण्यात येत आहे. सराटी, लुमेवाडी, गोंदी, ओझरे, पिंपरी बुद्रुक, टणू, नरसिंहपूर, गिरवी अशा जवळपास १५ शाळेमध्ये वह्यांचे वाटप करण्यात आले. त्यासाठी भैय्यासाहेब कोकाटे पाटील युवा प्रतिष्ठान सर्व सहकारी यांनी मोलाचे योगदान दिले.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा