कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
----- पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील मलिक नगरचा बादशहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर, भजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५५ रक्तदात्यांनी रक्तदानाचे महान व पवित्र कार्य पार पाडले.
पिंपरी बुद्रुक येथील सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असलेल्या मलिक नगरचा बादशहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी सामाजिक हिताचे कार्यक्रम राबविण्यात येतात. मंडळामध्ये मराठा, मुस्लिम, सुतार, कोळी, न्हावी आदि सर्वधर्मिय कार्यकर्ते व बांधवांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे.
प्रतिवर्ष सालाबाद प्रमाणे गणेशोत्सवा निमित्त रक्तदान हा जिवनावश्यक असणारा उपक्रम गणेश मंडळाच्या वतीने राबविण्यात आला. त्यानिमित्त सोलापूर येथील सिद्धेश्वर ब्लड बॅकेच्यावतीने ५५ रक्तदात्यांचे रक्तसंकलन करण्यात आले. यासाठी डॉ. अमोल हुबे, डॉ. मिलिंद गायकवाड यांनी रक्तसंकलन केले. गणेश मंडळाच्या वतीने रक्तदात्यास प्रमाणपत्र, चहा, बिस्किट, केळी, नाष्टा देण्यात आला.
त्याचप्रमाणे सायंकाळी पिंपरी बुद्रुक भजनी मंडळाच्या वतीने सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तत्पूर्वी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्याचा लाभ पिंपरी बुद्रुक भाविक, ग्रामस्थ व परीसरातील नागरिकांनी घेतला.
सदर कार्यक्रमास नवनाथ वाळेकर, आप्पा सुतार, उपसरपंच संतोष सुतार, ग्रामसेवक गणेश लांबते, भैय्यासाहेब कोकाटे, मच्छिंद्र खटके, डॉ. नेहल शहा, हरिदास सुर्यवंशी, लावंड आदिंसह भाविक, ग्रामस्थ व मंडळाचे तरूण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील मलिक नगरचा बादशहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा