अकलूज--- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथे नवीन बसस्थानक समोरील आयसीआयसीआय बॅंकेतून काढलेले ८ लाख ८५ हजार महिला बचत गटाच्या सभासदांसाठी पैसे काढलेल्या पैशाची बॅग चोरट्याने लंपास केली होती.
अट्टल आंतरराज्यीय चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला.अकलूज पोलीसांनी धडक कारवाई करत मध्यप्रदेश राज्यातून चोराकडून अकलूज पोलिसांनी संपूर्ण रक्कम जप्त करत केली आहे.त्यामुळे बचत गटातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.त्या अकलूज पोलीसांच्या या थरारक कारवाईने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
या चोरट्याने या तब्बल ८ लाख ७५ हजारांचा डल्ला टाकणारा बचत गटातील महिलांना वाटप करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी बँकेतून काढलेली रक्कम चोरट्याने पाळत ठेवून लंपास केली होती. सर्वसामान्य कुटुंबातील महिलांनी व्यवसायासाठी रक्कम चोरीला गेल्यामुळे बचत गटाची मोठी आर्थिक हानी झाली होती.परंतु अकलूज पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी यांनी तात्काळ तपास हाती घेत पोलिसांनी अधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करून आरोपीचा मार्ग काढत मध्य प्रदेशात सापळा रचून चोराला जेरबंद केले.
या धडाकेबाज कारवाईच्या कामगिरीमुळे अकलूज पोलीस स्टेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.या धडाकेबाज कामगिरीत हेड कॉन्स्टेबल शिवकुमार मदभावी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तपास पथक एएसआय निकम,पोलीस नाईक खरात व पोलीस नाईक लोहार यांनी विशेष भूमिका बजावली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा